मारेगाव तालुक्याचा 10 विचा निकाल 79.67 टक्के

साक्षी थिटे, वैष्णवी मेंढे, सौरव फरताड़े यांनी मारली बाजी

0

मारेगाव: 10 वी चा निकाल जाहीर झाला असून यात विद्यानिकेतनच्या इंग्रजी माध्यमातून शिकणारी विद्यार्थिनी कु. साक्षी थिटे व वैष्णवी मेंढे यांनी 92.20%  तर आदर्श हाईस्कूल येथील सेमि इंग्रजीचा सौरव फरताड़े याने 92.20 गुण घेऊन या तिघांनी मारेगाव तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कुलने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. मारेगाव तालुक्यातून 1114 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामध्ये 1102 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात 878 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याच्या 79.67 एवढा लागला आहे. यावर्षीही निकालामध्ये मुलींनीच बाज मारली आहे.

तालुक्याचा निकाल शासकिय आश्रम शाळा बोटोनी 92.72%, आदर्श हायस्कूल मारेगाव, 88.79%, पंचशील हायस्कूल नावरगाव 90.90%, राष्ट्रीय विद्यालय हिवरा 87.67, गजानन विद्यालय नरसाळा 83.33, कन्या विद्यालय मारेगाव 81.81, आदर्श हायस्कूल मार्डी 67.16, चोपने विधालय बोटोनी 77.77, भारत विद्या मंदिर 71.87, जगन्नाथ बाबा विद्यालय वेगाव 69.38, राष्ट्रीय विद्यालय मारेगाव 71.33, संकेत विधालय गौराळा-92.85, संकेत विद्यालय सराठी 96.66, दर्शन भारती गोंडबुरांडा 82.60, जीवन विकास हटवांजरी 93.10, नेताजी सुभाषचंद्रबोस म्हेसदोड़का 81.25, कर्मवीर भाउराव पाटिल चिंचमंडळ-70,गिर्जाबाई वि.पिसगाव-65,मोघे विधालय जळका-74.19,महात्मा फुले मारेगाव-53.12,चिंधुजि पुरके मारेगाव-85.71, विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कुल मारेगाव-100% निकाला लागला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.