10 वीच्या परीक्षेत ऋतुजा जेणेकर तालुक्यातून प्रथम

सर्व विद्यालयातून मुलीच टॉपर

0

विवेक तोटेवार, वणी: मार्च 2018 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला.  इयत्ता 10 वीच्या परीक्षेत यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. त्यात जनता विद्यालय वणीची कुमारी ऋतुजा विनिद जेणेकर हिने 97.40% गुण मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. एस पी एम विद्यालय वणीची कु. मानसी रवींद्र कांबळे ही 96% गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आली आहे. तर विवेकानंद विध्यालयातून कु. निकिता खाडे 96.40% सह प्रथम आली आहे. लायन्स इंग्लिश मिडीयम स्कुल मधून प्रथम कुमारी आरती सुनील उपरे ही आली आहे. तिने 95% गुण मिळविले आहे.

विवेकानंद विद्यालय,लायन्स व एस पी एम या विद्यालयातून प्रथम क्रमांकावर मुलींनीच आपले नाव कोरले आहे. तर जनता शाळेतील 17 विदयार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. वणी विभागातून 2856 विद्यार्थ्यांनि परीक्षेसाठी नोंदणी केली. मात्र प्रत्यक्षात 2849 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 2227 विद्यार्थी म्हणजे 78.16% विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. वणी विभागातून सर्वाधिक निकाल 100% हा वणी पब्लिक स्कुल चा तर सर्वात कमी निकाल म्हणजे 10 % हा जगन्नाथ महाराज विद्यालय वणीचा आहे.

वणी तालुक्याचा शाळानिहाय निकाल याप्रमाणे आहे.शासकीय माध्यमिक शाळा वणी 48.27%, एस पी एम विद्यालय वणी 81.39%, न्यू इंग्लिश हायस्कूल पुनवट 96.15%, आदर्श विद्यालय वणी 35.82%, जनता विद्यालय वणी 83.28%, आदर्श विद्यालय घोन्सा 83.01, जी.प. शाळा कुरई 72.72, नवभारत विद्यालय उकणी 68.75%, आदर्श विद्यालय साखर (कोळगाव) 91.66%, विवेकानंद विद्यालय नेरड 71.79%, विवेकानंद विद्यालय वणी 67.25%, गुरुदेव विद्यालय शीरपूर 63.33%, पंचशील विद्यालय नांदेपेरा 83.05, नालंदा विद्यालय वेळाबाई 79.71%, राष्ट्रीय विद्यालय राजूर (कॉलरी) 84.21, विवेकानंद विद्यालय कायर 67.04%, बालाजी माध्यमिक विद्यालय सावरला 86.79%, लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल वणी 95%, श्रीमती नुसाबई चोपणे विद्यालय वणी 76.27% ,आदर्श विद्यालय शिंदोला 90.90%, आदर्श विद्यालय साखरा(दरा) 76%, लोकप्रिय विद्यालय पेटूर 78.72%,

तुकडोजी महाराज विध्यालाय भालर 97.22%, ग्रामीण विकास विद्यालय ब्राह्मणी 82.35%, जनता विद्यालय मारेगाव (कोरंबी) 98.30), ग्रामीण विद्यालय परमडोह (चिखली)89.47%, भास्करराव ताजने विद्यालय कळमना 88.88%, गिरीजाबाई माध्यमिक विद्यालय मंदर 58.33, विठ्ठल पाटील मांडवकर विद्यालय तेजापूर 69.76%, राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय वणी 76.19, स्वरस्वती माध्यमिक विद्या मंदीर 95.8%, पिंपळकर माध्यमिक विद्यालय मेंढोली 73.07%, राष्ट्रीय विद्यालय बोर्डा 77.27%, वणी पब्लिक स्कूल वणी 100%, जगन्नाथ बाबा विध्यालाय वांजरी 90%, के एन कातकडे माध्यमिक विद्यालय चिखलगाव 82.22, साईकृपा माध्यमिक विद्यालय मुरधोनी 91.11, जगन्नाथ महाराज विद्यालय वणी 10%, लक्ष्मीबाई राजगडकर माध्यमिक विद्यालय शीरपूर 81.81%, एस पी पिंपलकर माध्यमिक विद्यालय नायगाव 80%

Leave A Reply

Your email address will not be published.