चाहत्यांच्या “चहा”ची न्यारी दुनिया…

‘‘बहुगुणी कट्ट्या’’त चहाच्या दुनियेची सफर घडविणारे अंजली आवारी यांचे स्पेशल आर्टिकल

0

‘फक्कडचहा’ ……….. असे शब्द जरी कानावर पडले तरी एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतं. तर मग त्याचा आस्वाद घेतांनाचा आनंद काही वेगळाच असतो. सकाळी सकाळी चहाचा एकेक घोट हा सुस्ती व आळस पळवून लावतो. त्या कपातून निघणाऱ्या वाफा मनाला एक वेगळीच उभारी देतात आणि त्यातआलं वा वेलची पडली की नुसत्या सुगंधानेचआपल्या जिव्हेला त्याचा मोह आवरत नाही.
हाच मोहआपण सरित व्दिगुणित होत असतो. पावसाने ओल्या चिंब झालेल्या त्या निसर्गाचे भरभरून कौतूक करताना चहाची सोबत हवीहवीशीच वाटते. शिणलेल्या जिवाला चहाची शरणागती पत्करल्याशिवाय गत्यंतरच नसतं. असाच हा हवाहवासा चहा सध्या मात्र त्याच्या रूपात बदल घडवून आणतोय. कधी ब्लॅकटीच्या तर कधी ग्रीनटीच्या रूपात. थोडक्यात काय तर आरोग्याच्या दृष्टीने आपण त्याच्यात आरोग्यवर्धक असे बदलच करतोय.
असाच एक आगळा-वेगळा बदल औरंगाबादेतील ‘‘टीक्लब’’ मध्येही दिसतोय. येथे तब्बल 35 प्रकारचे चहा मिळतात. त्यात फ्री टी वा पारंपारिक चहाही मिळतो. दिवसभरातून जवळपास 250 कप चहा येथे विकला जातो. अगदी कमी दरात म्हणजे फक्त 15 रूपयांपासून चहाच्या किंमतीला सुरूवात होते. स्वतःच्या तब्बेतीला जपणारा महिलावर्ग या ठिकाणावर खूप खूश असतो. शिवाय पर्यटकही येथील चहाच्या प्रेमात पडताना दिसताहेत.

चहा ही वनस्पती मूळ कॅमेलिया कुळातील. चीनमध्ये इ. पू. चौथ्या शतकांपासून चहाची लागवड होत आहे. चहाचे मूळ स्थान आग्नेय आशिया. भारतामध्ये 1940 नंतर चहा लोकप्रिय व्हायला सुरूवात झाली. दुसऱ्या महायुध्दानंतर भारतात सुध्दा महागाई वाढली. दूध घेणे परवडत नसल्यामुळे लोकांनी चहा हा पर्याय निवडला. चहामध्ये कॅफीनअसते, त्यामुळे त्याची सवय लागते.

भारतात आणखी एक प्रकारचा चहा प्रसिध्द आहे. तो म्हणजे कुल्हडमधील चहा. हा एक प्रकारचा कप असतो. जो मातीने बनविलेलाअसतो. यातील चहाला त्या मातीचा गंध लागतो. त्यामुळे चहाअधिकचसुंदरवाटतो. शिवाय स्वच्छतेच्या दृष्टीनेसुध्दा हे महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे प्लास्टिकही कमी वापरलं जातं. पर्यायाने निसर्गालाही जपण्यास मदत होतेच. भारतात काही विशिष्ट ठिकाणीच याचा वापर करतात. काही रेल्वे स्टेशनवरसुध्दा ‘कुल्हड’ वापरले जातात.

तसं पाहिलं तर चहा टपरीवरीलअसो किंवा फाईव्ह स्टारहॉटेलमधील तो समोर कसा येतो यावर त्याची किंमत ठरलेलीअसते. हल्ली चहावर होणारे प्रयोग खूप वाढलेआहेत. व्हाईट टी, येलो टी, अॅपल टी, तडका चहा, मिरचीचहाअशा निरनिराळ्या प्रकारात तो दिसतो. भारतात आसाम, दार्जिलिंग या प्रदेशांत चहाचे उत्पादन प्रामुख्याने होते. चहाची पाने कुस्करून त्यापासून चहापत्ती तयार केली जाते.

चहा हा नेहमीच कट्ट्याावरील रौनक व टपरीवरील गप्पांची रंगत बनलेलाअसतो. चहाप्रेमी लोक तरअगदी त्यालाआपला सखा वा मित्र मानतात. कारण तो त्यांना कुठेही कधीहीउपलब्ध असतो. त्यांची साथही देते व समाधानही. असा हा सर्वांना नेहमीच हवाहवा वाटणाराअमृततुल्य चहा स्वतःतचआपले एक दिव्य बाळगूनअसतो.

अंजली गुलाबराव आवारी
वणी

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.