वांजरी येथे शेतकऱ्याची आत्महत्या

0

विवेक तोटावार, वणीः मृग नक्षत्राला निसर्ग भरभरून देईल. यात हिरवे स्वप्न फुलेल. या आशेवर असताना, निसर्गाने दगा दिला. शंकरने एका सहकारी संस्थेकडून कर्ज घेतले. बियाणे घेतलीत. पेरणी केली. मात्र पावसाने पुन्हा दगा दिला. आलेली रोपे करपली. त्यात त्याची स्वप्नेदेखील जळून राख झालीत. याच निराषेतून तालुक्यातील वांजरी येथील शंकर बापूराव देउळकर (40) या शेतकऱ्याने आपले जीवन संपविले. ही घटना शनिवारी सकाळी घडली.

एवढे पैसे खर्च करूनदेखील सगळं करपलं होतं. शंकरसमोर दुबार पेरणीचा आणि आर्थिक समस्यांचा डोंगर उभा राहिला. यातून त्याने आपल्या शेतातच स्वतःला पेटवून घेतले. त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु 90ः जळल्याने शंकरला मेडिकल ऑफिसर भरती चक्रनारायन यांनी मृत घोषित केले. घटनेचा पुढील तपास स. पो. नि. पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार वासुदेव नारनवरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.