ट्राफिक पोलिसाला भर चौकात मारहाण

पोलिसांचा धाक कमी की वणीत दादागिरीत वाढ ?

0

विवेक तोटेवार, वणी: वणीतील खाती चौकात ट्राफिक पोलिसाला मारहाण करण्यात आली. गुरुवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. आरोपी हा मुळचा वणीचा असून यवतमाळ येथे पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे.

ट्राफिक पोलीस राजू टेकाम (32) हे संध्याकाळी कर्तव्यावर होते. त्याच वेळी तिथून अविनाश बलकी हा बाईकने येत होता. त्यांनी खाती चौकात एकेरी वाहतुकीचा नियम तोडला. त्यामुळे टेकाम यांनी बलकी यांना थांबवले असता. त्यांनी खाली उतरून राजू टेकाम यांना मारहाण करण्यास सुरूवात केली, मारहाण बघून परिसरातील नागरिकांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मारहाणीची घटना माहिती होताच सहायक वाहतूक निरीक्षक संग्राम ताठे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लगेच आरोपी अविनाश बलकी यांना ताब्यात घेतले. मारहाण करते वेळी आरोपी मद्यधुंद असल्याची माहिती मिळत आहे. अविनाश बलकी हे पंचायत समिती यवतमाळ येथे कार्यरत असून त्यांच्यावर याआधीही एका प्रकरणात गुन्ह्याची नोंद आहे. आरोपीवर सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वाहतूक पोलिसांना मारहाण होण्याची ही दुसरी घटना आहे. याआधीही एका महिला वाहतूक पोलीस कर्मचा-या मारहाण झाली आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक उरलेला नाही की वणीत दादागिरी वाढत चालली आहे असा सवाल जनतेमधून पुढे येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.