झरी तालुक्यात 2 लाख 66 हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य

0

सुशील ओझा, झरी: १३ कोटी वृक्षलागवड योजने अंतर्गत झरी तालुक्यात २ लाख ६६ हजार झाडांची लागवड वनविभाग करणार आहे. १ ते ३१ जुलै या कालावधीत तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीसह अशासकीय संस्था, नगर पंचायत, आदी विभाग या मोहिमेत सहभागी होत आहे. .

झरी तालुक्यात वृक्षलागवड मोहिम यशस्वी व्हावी म्हणून वन विभागाने जोरदार तयारी केली आहे. माथार्जून येथे रोपवाटीकेत १८ महिन्यावरून ७७ हजार ६०९ रोपे उपलब्ध आहे. बेलमपेल्ली रोपवाटीकेत २६ हजार ९०६ तर सामाजिक वनिकरणच्या हिवरा बारसा येथील रोपवाटीकेत ४३ हजार २३० उंच रोपे उपलब्ध आहे. वनमहोत्सव अंतर्गत मोठी व उंच रोपे ४० रुपये तर एक महिन्याच्या रोपाची किंमत ८ रुपये आहे.

झरी तालुक्यात ५५ ग्रामपंचायती असून, प्रत्येक ग्रामपंचायतीला बाराशे रोप लागवडीचे उदिष्ट दिले आहे. तालुक्यात ग्रामपंचायती ६६ हजार ४५ तर खाजगी संस्थासह वनविभागा अंतर्गत १६ हजार ६७७ रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त मुकुटबन व जामनी वनपरिक्षेत्र तसेच सामाजिक वनीकरण विभागाद्वारे १ लाख ८५ हजार झाडे लावली जाणार आहे. या कार्यक्रमात जनतेनी सहभागी व्हावे असे आवाहन वनविभागने केले आहे. .

रोपांचे स्टॉल उभे केले जाणार
नागरिकांना सहज रोपे उपलब्ध व्हावी झरी तहसील कार्यालयापूढे रोप विक्रीची स्टॉल उभी केली जाणार आहे. या ठिकाणावरून नागरिकांनी रोपे उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहनही वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वारे, एस. जी. मेहेर, क्षेत्रसहायक एस. आर. राजूरकर, एम. लडके, ए. यू. जिडेवार, बी. सी. लोखंडे यांनी केले आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.