शिंदोल्यामध्ये महसूल विभागातर्फे वृक्षारोपण
विलास ताजने, मेंढोली: शिंदोल्यातील महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी कार्यालयात आज शुक्रवारी दुपारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सुमारे 25 झाडे लावण्यात आली. यात करंजी, अर्जून, सप्तपर्णी, रेनट्री इत्यादी वृक्षरोपणाची झाडे लावण्यात आली. वणीचे तहसिलदार रविंद्र जोगी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही झाडे लावण्यात आली.
महाराष्ट्र सरकारने राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करून पर्यावरण संतुलित करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यात वनविभागतर्फ़े तसेच शासकीय निमशासकीय, ग्रामपंचायत, नगरपंचायत, द्वारे ही वृक्ष लागवड करण्यात येत आहे. याच अनुषंगाने महसूल विभागाने हे वृक्षारोपण केले आहे.
यावेळी वणीचे तहसिलदार रविंद्र जोगी, मंडळ अधिकारी उल्हास निमेकर, चिखलीचे तलाठी विक्रमसिंग घुसिंगे, ढाकोरीचे तलाठी मुकेश इंगोले, शिंदोल्याचे तलाठी भागवत आरु, साखरा-कोलगावचे तलाठी नितेश पाचभाई, कोतवाल जगदीश चांदेकर, कोतवाल काशिनाथ मडावी आणि महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.