माळ तू विठ्ठला…

आषाढी एकादशीनिमित्त सुनील इंदुवामन ठाकरे यांची कविता...

0

माळ तू विठ्ठला
टाळ तू विठ्ठला
लावला गुलाल बुक्का
ते भाळ तू विठ्ठला

आसवांचे साचले तळे
भक्तीचे फुललेत मळे
प्राणगंध चोरल्याचा
आळ तू विठ्ठला

वणवण भटकंती
वणवा हा जिवाला
पोटातील विखारी
जाळ तू विठ्ठला

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

देवपण तुझे मुके
सोडूनी अशा वेळी
माणसाचा धर्म आता
पाळ तू विठ्ठला

सुनील इंदुवामन ठाकरे

8623053787
9049337606

Leave A Reply

Your email address will not be published.