बहुगुणी डेस्क, वणीः येथील वार्ड क्रमांक चारमधील विराणी टॉकीजच्या बाजूला एक गल्ली आहे. डॉ. सुराणा यांचा दवाखाना असलेल्या या गल्लीतील रस्त्याची पुरती ‘वाट’ लागलेली आहे. हा मार्ग मंजूर झाला आहे. तरीदेखील या रस्त्याची दुरूस्ती का होत नाही असा सवाल प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. उपविभीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनासह एक प्रत वणी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिली आहे. या गल्लीत एवढे खड्डे आहेत, की ‘खड्ड्यात गेली गल्ली’ म्हणून जनशक्ती पार्टी वैतागली आहे. त्यातूनच त्यांनी हे निवेदन सादर केले.
ही गल्ली अनेक वर्षांपासून उपेक्षितच आहे. शाळा, कॉलेज तसेच कोचिंग क्लासेससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची या गल्लीतून मोठी वर्दळ असते. या गल्लीतील खड्ड्यांमुळे नेहमीच किरकोळ अपघात होत असतात. या परिसरातील नागरिकांनादेखील या खड्ड्यांचा अतोनोत त्रास सहन करावा लागत आहे.
या गल्लीत खड्डे आहेत, की खड्ड्यात ही गल्ली आहे असा सवाल प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. प्रहारचे जिल्हा सचिव सिध्दीक रंगरेज यांच्या नेत्तुवात समीर बेग, रितेश पोहेकर, प्रफुल पारीख, शालिक टेकाम, आसिफ विराणी, सुधा पेटकर, राजू शेंडे, आदील अहेमद, विजय पेटकर, संदीप दातारकर, रफीक शेख, सूरज आत्राम, दशरथ धानोरकर, मंगेश हनुमंते यांच्या स्वाक्षरींसह हे निवेदन देण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकदेखील मोठ्या संखेने उपस्थित होते.