शुक्रवारी कुपोषित बालकांना सकस आहार वाटप व वृक्षारोपण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

0

बहुगुणी डेस्क, मारेगावः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त शिवसेना , युवासेना, महिला आघाडी तथा मारेगाव शिवसैनिकांनी विविध उपक्रम शुक्रवारी आयोजित केले आहेत. या अंतर्गत 27 जुलै शुक्रवारी सकाळी 11 वाजता मारेगाव येथील वसंत जिनिंग शेतकरी सुविधा केंद्र येथे कुपोषित बालकांना सकस आहार वाटप व वृक्षारोपण होणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मारेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष रेखा शरद मडावी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होईल. माजी आमदार तथा शिवसेना यवतमाळ जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर हे या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. माजी नगराध्यक्ष इंदू किन्हेकर, डॉ. सपना केलोडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मांडले या सोहळ्याचे प्रमुख अतिथी आहेत. या सोहळ्यााला उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.