पाराशर ब्राह्मण सभेचा गुरू पौर्णिमा उत्सव साजरा

0

बहुगुणी डेस्क, वणी: पाराशर ब्राह्मण सभेच्या वतीने वाघदरा येथे गुरु पौर्णिमा तथा व्यासपूजन उत्सव साजरा झाला. प्रमुख अतिथी डॉ. स्वानंद पुंड होते. अध्यक्षस्थानी श्रीकांत माहुरकर तर प्रमुख उपस्थिती रूपात प्रणिता पुंड आणि विलास उपाध्ये उपस्थित होते. याप्रसंगी कोमल खनगण, भूषण बागळदे आणि फाल्गुनी रावणहत्ते या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

Podar School 2025

डॉ. स्वानंद पुंड यावेळी म्हणाले की, कृतज्ञतेचा सुंदरतम आविष्कार म्हणजे गुरु पौर्णिमा होय. मानवाच्या मानवतेला अधोरेखित करणाऱ्या ज्या मूल्यांची जोपासना भारतीय संस्कृतीने केली, त्यापैकी नितांत सुंदर मूल्य म्हणजे कृतज्ञता होय .आजवर आयुष्यात ज्यांनी ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाला अधिक सौंदर्यपूर्ण आयाम प्रदान केले त्या सगळ्यांच्या प्रती मनात असणाऱ्या कृतज्ञतेला मूर्त रूप देण्याची सुंदर पद्धती म्हणजे गुरुपौर्णिमा होय. ज्या भगवान वेदव्यासांनी भारतीय संस्कृतीच्या या सगळ्या मूल्यांना आपल्या अफाट साहित्यातून सगळ्या जगाच्या समोर प्रगट केले त्या भगवान वेदव्यासांना वंदन करण्याचा हा दिवस. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत अशा मूल्यांना आपल्या अंगी रुजवणे यासाठीच गुरुपौर्णिमा उत्सव असतो.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश देशकर यांनी, प्रास्ताविक दीपक उपाध्ये आणि आभार प्रदर्शन किरण आचार्य यांनी केले. कीर्ती देशकर यांच्या मार्गदर्शनात समाजबांधवांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करता अथक प्रयत्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.