शिंदोल्याच्या जंगलात बेपत्ता व्यक्तीचा आढळला मृतदेह

0

विलास ताजने,मेंढोली:  गत दहा बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिंदोला येथील  व्यक्तीचा मृतदेह शिंदोला येथील आदर्श विध्यालया समोरच्या जंगलात आढळल्याची घटना (दि.४) मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

वणी तालुक्यातील शिंदोला येथील शेषराव लोहकरे वय (५८) असे मृतकाचे नाव असून तो सद्या कुरई येथे पत्नी सोबत राहत होता. साधारणतः गेल्या वीस वर्षांपासून शेषरावच मानसिक स्वास्थ्य बिघडलेल होत. काही दिवस घरी राहणे तर काही दिवस जंगलात, गावात भटकंती करणे अशी त्याची जीवनशैली होती. तो दहा बारा दिवसांपासून बेपत्ता होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सोमवारला गुराखी जंगलात गुरे चारताना दुर्गंधी येत असल्याने शोध घेतला. तर पूर्ण मांस गळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. सदर वार्ता गावात माहीत होताच पोलिस पाटील लक्ष्मण बोबडे, पंचायत समिती सदस्य संजय निखाडे यांच्यासह ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असता मृतकाच्या अंगावरील कपडे, हातातील धागेदोरे यावरून तो मृतदेह शेषरावचा असल्याची खात्री पटली.

सदर घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. प्रेताचे शवविच्छेदन घटनास्थळीच करून अंत्यसंस्कार करण्यात आले. बलदंड शरीराच्या शेषरावचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहे. मृतकाच्या मागे पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.