वणीतील गांधी चौकात धाडसी चोरी

चोरट्यांनी केले 9 लाखांचे मोबाईल लंपास

0

विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी रात्री वणीतील गांधी चौकातील प्रसिद्ध व्यापारी प्रतिष्ठान विठ्ठलदास देवचंद इथे 9 लाख रुपयांची धाडसी चोरी झाली. याबाबतची तक्रार दुकानाचे संचालक उदयकुमार कांतीलाल जोबनपुत्रा यांनी शुक्रवारी वणी पोलिसात केली आहे. भर चौकात धाडसी चोरी झाल्याने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

गुरुवारी रात्री उदयकुमार दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर रात्री काही चोरट्यांनी दुकानाच्या पहिल्या मजल्यावरील दार तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानाच्या आलमारीत ठेवलेले जवळपास 9 लाख रुपयांचे मोबाईल त्यांनी चोरून नेले. सोबतच 3 चांदीचे नाणे ही चोरट्याने चोरले. हा एकूण 9 लाख 900 रुपयांचा ऐवज आहे. सकाळी उदयकुमार यांना झालेल्या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठले आणि याबाबत तक्रार दिली.

जोबनपुत्रा यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 457, 380 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस चोरट्याचा कसून शोध घेत आहे. एका प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून रात्री 3 वाजताच्या सुमारास दोन अज्ञात इसम सेवन स्टारच्या मागच्या बाजूला पिशव्या घेऊन जात होते. त्यांनीच चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घटनेचा पुढील तपास पोउनि हिवसे करीत आहे. या घटनेने चोरट्यांचा धुमाकूळ वणीत सुरू झाला असल्याची कुजबुज जनतेत सुरू झाली आहे. भर चौकात चोरी झाल्याने व्यापारी वर्गातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.