जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील नांदेपेरा मार्गावरील बँक कॉलनीतील रहिवासी असलेल्या एका नामवंत कोळसा व्यावसायिकांच्या घरी रविवारी मध्यरात्री दरम्यान धाडसी चोरी झाली. यात सुमारे 35 तोळे सोनं आणि लाखों रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. घटनेच्या वेळी घरचे सहकुटुंब नागपूर येथे गेल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार राजाा उर्फ राजकुमार जयस्वाल मुळचे नागपूर येथील असून ते बँक कॉलनीत राहतात. त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. गणेश उत्सवासाठी ते आपल्या कुटुंबासह दोन दिवसापूर्वी नागपूर येथे गेले होते. यातच चोरट्याने डाव साधून त्यांचे घरातील स्वयंपाक गृहाचे दार तोडून घरी प्रवेश केला. बेडरुम मधील कपाटातील अंदाजे 35 तोळा सोन्याचे दागिने आणि 3 लाख रूपये रोख लंपास केली.
जयस्वाल कुटुंवीय सोमवारी सायंकाळी नागपूर येथून परत येऊन घराचे दार उघडले असता त्यांना बेडरूम मधील कपटाचे दार उघडे असल्याचे दिसले तसेच सामानाची नासधूस झालेली दिसली. घटने बाबत राज जयस्वाल यांनी वणी पो.स्टे. ला सूचना दिल्यावरून पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला. रात्री 12 वाजताच्या दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्ररणीअजून श्वान पथक व फिंगर प्रिंट पथक आले नाही. ही चोरी ओळखीच्या व्यक्तींनाच चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
वणीत चोरीचे सत्र सुरूच
गेल्या काही दिवसांपासून वणीत चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून चोरीचेे सत्र थांबण्याचे काही चिन्ह नाही. गेल्या आठवड्यातच मंदर येथे दोन चोऱ्या तसेच विठ्ठलदास देवचंद यांचे दुकान चोरट्याने चक्क दोनदा फोडले. यात लाखो रुपयांचे मोबाईल चोरीला गेले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलासह तिघांना अटकही केली. आता या चोरीतही त्याच चोरट्यांंचा हात आहे की टुसरी टोळी परिसरात कार्यरत आहे याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांवर आहे.