‘त्या’ ७२ कुटुंबियांच्या नावे जमीन करणार

हंसराज अहिर यांनी दिले आश्वासन

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन व रुईकोट येथील निराधार कुटुंबांना जगण्यासाठी हक्काची नोकरी किंवा इतर कोणतेही साधन नाही. त्यामुळे महसुलाच्या ई वर्ग असलेल्या शासकीय जागेवर मुकुटबन व रुईकोट येथील काही निराधार कुटुंब गेल्या 20 वर्षांपासून अतिक्रमण करून शेती वाहत आहे. याच शेतीच्या भरवशावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सदर शेती शासनाने अतिक्रमण धारकांच्या नावे करून दयावे ही मागणी मुकुटबन येथील १२ व रुईकोट येथील ६० अशा एकूण ७२ लोकांनी केली होती.

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर मुकुटबन येथे ३० सप्टेंबरला कार्यकर्ता मेळाव्या करीता आले असता ७२ अतिक्रमणधारक शेतक-यांनी अहिर यांच्या समोर समस्या मांडल्या व निवेदन दिले. अहिर यांनी सर्व समस्या ऐकून पीडित शेतकऱ्यांच्या नावाने अतिक्रमण असलेली जमीन त्यांच्याच नावाने करून देण्याकरिता पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सरपंच शंकर लाकडे हे मंत्री हंसराज अहिर त्यांच्या अगदी जवळचे असल्याने अतिक्रमण धारकांची आशा बळावली आहे.

मंत्री हंसराज अहिर यांची भेट घेतांना स0रपंच शंकर लाकडे ,उपसरपंच अरुण आगुलवार, ग्रामपंचायत सदस्य ,व अतिक्रमण धारक अंकलू गोनलावर, गजानन पैसटवार, रेखाबाई पारशीवे, गंगुबाई दासरवार,सरस्वतीबाई गुरनुले, पर्वताबाई परचाके, नागुबाई मडावी, गवळण कुमरे, गंगाराम शंकावार, गंगाराम आरमुरवार,शेख फिरोज, श्यामराव कुचनकर, पंचफुलाबाई क्षीरसागर, रामलू कुंटावार, पुजाराम पेंदोर,सह कुटुंबियतील सदस्य उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.