राशनकार्ड व मतदान ओळखपत्रासाठी वेगावात शिबिर

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील वेगाव येथे गांधी जयंतीच्या पर्वावर राशनकार्ड व मतदान ओळखपत्रासाठी ग्रा.पं.च्या समाजभवनात तहसीलदार विजय साळवे यांच्या उपस्थितीत भाजपचे तालुका सरचिटणीस रमण डोये यांच्या नेतृत्वात शिबिर घेण्यात आले . या शिबिराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या शिबिरात नवीन राशनकार्ड, दुय्यम राशन कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच पात्र मतदारांना मतदार विशेष मोहिमे अंतर्गत मतदान ओळख पत्राची नोंदणी करुन मतदान ओळखपत्राचे सुद्धा वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच माला गौरकार, उपसरपंच ज्ञानेश्वर किंगरे,आत्मा संस्थेचे मारोती डोये, मधुकर टोंगे आदी उपस्थित होते. या शिबिरासाठी निवडणूक निर्णय अधिकारी दासरवार, पुरवठा निरीक्षक ओंकार पडोले आदी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.