विमानतळाच्या टॉयलेटच्या फ्लशमध्ये सापडलं 1 किलो सोनं

तस्कराला सापळा लावून केली अटक

0

मुंबई: मुंबई विमानतळावरील टॉयलेटच्या फ्लशमध्ये तब्बल 1 किलो सोनं सापडलं आहे. या प्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती हा सराईत असून मोहम्मद अली केकेपूरम असे या तस्कराचे नाव आहे. हा तस्कर सोने घेऊन येणार असल्याची टीप कस्टम अधिकाऱ्यांना लागली होती. त्यावरून अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला अटक केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद अली केकेपूरम या तस्कराची विदेशातून भारतात आणि भारतातून विदेशात सोने तस्कर करण्याची पहिलीच वेळ नाही. या आधी हा तस्कर गेल्या सात महिन्यांत पाच वेळा अशा प्रकारे सोने तस्करी केली आहे, याची टीप अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीवरून अधिकाऱ्यांनी सापळा लावला आणि मोहम्मद अली हा विमानतळावर उतरताच अधिकाऱ्यांनी त्याच्यावर बारकाईने नजर ठेवली.

दरम्यान, मोहम्मद अलीला आपल्यावर कोणीतरी नजर ठेऊन आहे याची चाहूल लागताच तो प्रथम टॉयलेटमध्ये गेला. त्यानंतर कस्टम काऊंटरवर गेला. दरम्यान, अधिकाऱ्यांनी त्याला पकडले. त्याची झडती घेतली. पण, त्याच्या बॅगेत काहीच सापडले नाही. त्यामुळे अधिकाऱीही काही अंशी आश्चर्यचकीत झाले.

त्याच्याकडे सोने असल्याची 100 टक्के खात्रीशीर टीप अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी शोध घेण्यास सुरूवात केली. तो उतरल्यावर टॉयलेटमध्ये गेला असल्याचे लक्षात आल्याने अधिकाऱ्यांनी तात्काळ टॉयलेटमध्ये जाऊन तपासाला सुरूवात केली. त्यावेळी दोन टॉयलेटच्या फ्लशची बटनं खराब झाल्याचे आढळून आले.

(हे पण वाचा: व्यसनाधीन पतीचा केला पत्नीनं खून)

अधिकाऱ्यांचा संशय बळावल्याने अधिकाऱ्यांनी या फ्लशच्या बटनाची तपासणी सुरू केली असता फ्लशच्या बटनमागचे छिद्र दुसऱ्या सर्व्हिस रूमशी कनेक्ट असल्याचं आढळून आलं. सर्व्हिस रूम उघडल्यानंतर त्यात ३४ लाख रूपये किंमतीचे १ किलो सोने आढळले. मोहम्मदनेच हे सोने लपवल्याच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आली मात्र नंतर त्याला जामीनावर सोडून देण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.