गुरुवारी मारेगावात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

0

नागेश रायपुरे, मारेगाव: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जि. नाशिक, सद्गुरु प.पु.मोरे दादा चेरिटेबल हॉस्पिटल अॅन्ड मेडिकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विजयादशमी निमित्य उद्या दिनांक 18 ऑक्टोबर गुरुवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक शेतकरी सुविधा मंगल कार्यालयात हे शिबिर आहे. यात आरोग्य तपासणी, नाडी परीक्षण करण्यात येणार आहे.

या आरोग्य शिबिरात हृदयरोग तज्ज्ञ, मधुमेह, कॅन्सर, रक्तदाब, संधिविकार, त्वचा, वात, पोटाचे विकार, महिला रोग, मुळव्याध, बालरोग, मनोविकार, इत्यादी रोगांवर निदान केले जाणार आहे.

या आरोग्य शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणीत) स्वामी समर्थ संतोषी माता मंदिर प्रभाग क्र.1 मारेगाव यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.