ज्योतिबा पोटे, मारेगाव : गेल्या अनेक वर्षांपासून मारेगावात तरूणांकडून क्रीडांगणाची मागणी होत आहे. मात्र,इथल्या राजकीय व प्रशासकीय अनास्थेपोटी तरुणांना क्रीडांगणापासून वंचित राहावे लागत आहे. या बाबीची पूर्तता व्हावी यासाठी तरुणांनी येथील नगरपंचायत प्रशासनाला निवेदन सादर करुन क्रीडांगण उपलब्ध करुन देण्याची मागणी मारेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी पृथ्विराज माने पाटील यांना सादर केले.
आदिवासीबहुल तालुका असलेलं मारेगाव हे तालुक्याचे ठिकाण अाहे. येथे तीन महाविद्यालये व अनेक शाळा आहेत. तालुक्यातील अनेक गावातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. मात्र तालुक्याच ठिकाण असून गेल्या अनेक वर्षापासून राजकीय नेतृत्व करणारे पुढारी केवळ मताच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असल्याने तालुक्यातील अनेक समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत स्वत:ची प्रगती हेच ध्येय समोर आहे असा तरूणाचा समज झाला.
शासनाकडून क्रीडांगणासाठी मिळणारा निधी राजकीय व प्रशासकीय अनास्थेने अनेक वेळा परत गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तरुणांनी पुढाकार घेत येथील नगरपंचायत प्रशासनाला क्रीडांगण तरुणांना खेळण्यासाठी तातडीने उपलब्ध करुन द्यावे म्हणून निवेदन सादर केले यावेळी मयुर निब्रड, मयुर मसराम, समीर सय्यद , नवीन बामने, समीर कुळमेथे, मारोती परचाके, रायल सैय्यद, संतोष कनाके व असंख्ये तरुण उपस्थित होते.