लाल बावटा शेतमजूर युनियनचे राज्य अधिवेशन 28 व 29 ला
बहुगुणी डेस्क, वणी : महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे राज्य अधिवेशन वणी येथे दि 28 व 29 ऑक्टोबरला वसंत जिनिंग सभागृह वणी येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाला भारतीय खेत मजदूर युनियनचे राष्ट्रीय सचिव कॉ .व्हि एस निर्मल कॉ डॉ भालचंद्र कांगो राष्ट्रीय सचिव भा.क.प कॉ.नगेंद्रनाथ ओजा राष्ट्रीय महासचिव तसेच कॉ तुकाराम भस्मे हे मार्गदर्शन करणार आहेत .
या अधिवेशनाचे निमित्ताने दि 28 ऑक्टोबरला मिरवणूक काढून टिळक चौक वणी येथे जाहीर सभा होणार आहे .दोन दिवशीय त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये शेतमजुरांचा स्वमीनाथन आयोग, रेशन, पेंशन, रोजगार, आरोग्य आणि शिक्षण वन व गायरान जमिनीचा पट्टा आदी विविध प्रश्नांवर चर्चा करून शेतमजुरांच्या आगामी आंदोलनाची दिशा या अधिवेशनात ठरविण्यात येणार आहे .तसेच विविध ठराव मांडण्यात येणारं आहे.
या अधिवेशनात राज्यातील विविध जिल्ह्यातील 450 निवडक प्रतिनिधी उपस्थित राहतील. तेव्हा या अधिवेशनाचे निमित्ताने निघणार असणाऱ्या मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन कॉ अँड मनोहर टाकसाल कॉ शिवकुमार गणवीर कॉ नामदेव चव्हाण, कॉ दिलीप परचाके , कॉ दिनकर खुशपुरे कॉ अनिल घाटे कॉ बंडू गोलर कॉ वासुदेव गोहणे, कॉ अरुण साळवे, कॉ उत्तम गेडाम, कॉ सुनील गेंडाम यांनी केले आहे .