रविवारी वणीत शहीद राजेंद्र कुळमेथे यांना आदरांजली

सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी केले आवाहन

0

विवेक तोटेवार, वणी: कर्तव्यावर असताना आरोपीने केलेल्या भ्याड हल्लात शहीद झालेले मारेगाव येथील पोलीस जमादार राजेंद्र कुळमेथे यांना उद्या रविवारी वणीत आदरांजली वाहली जाणार आहे. स्थानिक शिवतीर्थाजवळ दुपारी 3 वाजता सर्व पक्षांतर्फे आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील अनिल मेश्राम हा एका गुन्ह्यात आरोपी आहे. सदर आरोपी विरुद्ध अटक वारंट घेऊन त्याला ताब्यात घेण्यासाठी मारेगाव पोलिसांची चमू आरोपीच्या घरी गेली होती. मात्र आरोपीने उलट पोलिसांवर हल्ला केला. यात जमादार राजेंद्र कुळमेथे यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर आरोपी फरार आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची टीम शोध घेत आहे. मात्र अद्यापही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.

कर्तव्य बजावताना शहीद झालेले राजेंद्र कुळमेथे यांना आदरांजली वाहण्यासाठी वणीतील सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एक झाले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन स्वप्नील धुर्वे, प्रवीण खानझोडे, विकेश पानघाटे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.