पिंप्रड येथील ग्रामसभा समस्यांनी गाजली

0

झरी, बहुगुणी डेस्क: तालुक्यातील सर्वात मोठी १५ सदस्यीय ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत असून यावर भाजपची सत्ता आहे. गेल्या साडेतीन वर्षात जी विकासकामे झाली ती गेल्या २५ वर्षात झाली नाहीत असे गावकऱ्यांतूनच ऐकायला मिळत आहे. मुकुटबन ग्रामपंचायतमध्ये ५ वॉर्ड असून पाचही वार्डात जनतेला पाहिजे त्या सुविधा सरपंच,उपसरपंच, सचिव व सर्व सदस्यांनी तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने करून दिल्या आहे. ज्यामुळे ग्रामवासियात ग्रामपंचायत विषयी समाधान व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायत अंतर्गत समस्या जाणून घेण्याकरिता पिंप्रड येथे ३० नोव्हेंबर रोज ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. पिंप्रड गाव वॉर्ड क्रमांक एक मध्ये येत असल्याने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.सुरवातीला ग्रामसभेकरिता १०० लोकांची उपस्थिती नसल्याचे कारण पुढे करण्यात आले नंतर १०६ लोकांच्या उपस्थितीत ग्रामसभा सुरु करण्यात आली. सभेत ग्रामविकास अधिकारी कैलास जाधव यांनी १९१९-२० चे अंदाजपत्र वाचून दाखवले व ज्या लोकांचे घरकुल बांधकाम पूर्ण करून लाभर्थ्यांनी चेक उचलून घेऊन जाण्यास सांगितले.

पिंप्रड गावातील नाल्या, अंतर्गत रस्ते, जनावरांना पिण्याकरिता पाण्याचा टाक्या बांधणे, अंगणवाडी दुरुस्ती करणे, सांडपाणी व नालीच्या पाण्याकरिता शोषखड्डे तयार करणे अशा अनेक विषयांवर चर्चा झाल्यात. मांडलेल्या सर्व समस्यांचे निराकरण त्वरित सोडवण्याचे आश्वासन ग्रामपंचायत द्वारे देण्यात आले.तसेच गावात ग्रामपंचायत चषक क्रिकेट सामन्याला १ लाख रुपयाचे बक्षीस कुठून देण्यात आल्याचे प्रश्न काही लोकांनी उपस्थित केले असता सरपंच लाकडे यांनी मी, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य मिळून देणार असल्याचे सडेतोड उत्तर दिल्याने सर्वच गप्प झाले.

गावाचे नावलौकिक व ग्रामपंचायतचे नाव मोठे करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत चषक म्हणून सामने भरविण्यात आले असे सरपंच लाकडे यांनी सांगितले. ग्रामसभेत सरपंच शंकर लाकडे उपसरपंच अरुण आगुलवार , ग्रामविकास अधिकारी कैलास जाधव,सदस्य सत्यनारायण येनगंटीवार,संदीप विचू, सुरेश ताडुरवार, अशोक कल्लूरवार, सह महिला सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी संजय पारशीवे, श्रीनिवास संदरलावार व मुकुटबन व पिंप्रड येथील ग्रामवासी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.