कबड्डी सामन्यादरम्यान प्रेषक गॅलरी कोसळली

0

विलास ताजने, वणी:  चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे कबड्डीचा अंतिम सामना सुरू असताना अचानक प्रेषक गॅलरी कोसळल्याची घटना दि.१० सोमवारी रात्री ९:३० वाजताच्या दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार या घटनेत ५० च्या जवळपास प्रेक्षक जखमी झाले आहे. 


राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार ऍड. संजय धोटे यांच्या पुढाकारातून राजुरा येथे तीन दिवसीय विदर्भ स्तरिय आमदार चषक कबड्डी स्पर्धा सुरू आहे. सोमवारी रात्री अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती. काही अतिउत्साही प्रेक्षक हुल्लडबाजी करीत होते. गॅलरीवर क्षमतेपेक्षा अधिक प्रेक्षकांनी गर्दी केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...


मंडळ पदाधिकारी वारंवार सूचना देत होते. मात्र प्रेक्षक सुचनेकडे दुर्लक्ष  करीत होते. गर्दीचा भार वाढल्याने अचानक गॅलरी कोसळली. दरम्यान चेंगराचेंगरी होऊन अनेक प्रेक्षक जखमी झाले. काही प्रेक्षकांचे पाय गॅलरीत अडकले होते. त्यांना गॅलरी तोडून काढण्यात आले. जखमींना राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गंभीर जखमींना चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. मंडळाचे पदाधिकारी जखमींना सर्वोतोपरी मदत करीत आहे.

लिंकवर क्लिक करून पाहा घटनेचा व्हिडीओ..

Leave A Reply

Your email address will not be published.