शिंदोला येथे राष्ट्रसंत पुण्यतिथी महोत्सव 25 पासून

0

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिंदोला येथे गुरुदेव सेवा भजन मंडळ आणि ग्रामस्थांच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव व सत्संग सोहळा आयोजित केला आहे. तुकडोजी महाराज पुतळा परिसरात २५ ते २८ डिसेंबर दरम्यान कार्यक्रम होणार आहे. २५ डिसेंबरला सकाळी सहा वाजता घटस्थापनेने उत्सवाला सुरुवात होणार आहे. दुपारी तीन वाजता खंजिरी भजन आणि रात्री आठ वाजता गुरुदेव सेवाश्रम पाटसूल (अकोला) येथील उद्धवराव गाडेकर महाराज यांचा समाजप्रबोधन कार्यक्रम होणार आहे.

२६ डिसेंबरला दुपारी तीन वाजता वारकरी संप्रदाय संगीत कार्यक्रम, रात्री आठ वाजता पिंपरी इंजाळा (घाटंजी) येथील राजू विरंदडे महाराज यांचा समाजप्रबोधन कार्यक्रम होणार आहे. २७ डिसेंबरला रात्री सात वाजता सामुदायिक प्रार्थना, रात्री आठ वाजता नांदुरा आश्रम, (बुलडाणा) येथील वेदांताचार्य वेरुळकर गुरुजी यांचे राष्ट्रसंत विचार भाषण, साडेआठ वाजता गुरुकुंज मोझरी येथील रवी मानव यांचे व्याख्यान तर नऊ वाजता नागपूर येथील सप्त खंजिरीवादक आकाश पाले यांचे कीर्तन होणार आहे.

२८ डिसेंबरला सकाळी रामधून, ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान व वेरुळकर गुरुजी यांचे आध्यात्मिक चिंतन, गुरुकुंज मोझरीचे रवी मानव यांचे भाषण, नऊ वाजता कार्यकर्ता मेळावा, वेळाबाईच्या संभाजी मोहितकर यांचे ग्रामगीता मार्गदर्शन आणि दुपारी बारा वाजता वडगावच्या (चंद्रपूर) डाखरे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. कार्यक्रमात बीबी (गडचांदूर) येथील वैद्यकीय समाजसेवक वैद्य गिरीधर काळे यांचा समाजकार्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.