कोथूर्ला येथील दाम्पत्याचा अपघाती मृत्यू

0

विलास ताजने, वणी: मारेगाव तालुक्यातील कोथूर्ला येथील गौरकार दाम्पत्याचा वरोरा जवळील येन्सा  येथे जाताना दि. २५ मंगळवारी रात्री अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

किसन कवडू गौरकार वय ५२ आणि मंदा किसन गौरकार वय ४५ अशी मृतकांची नावे आहेत. सदर दाम्पत्य वरोरा तालुक्यातील वनोजा येथे एक मंदिरात कार्यक्रमासाठी गेले होते. जेवण झाल्यावर रात्री आनंदवन मार्गावरील येन्सा येथील नातेवाईकाकडे  दुचाकीने जातांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली.

या घटनेत मंदाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर किसन यांचा  उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला. भद्रावती पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.