चालत्या बसमध्ये मारला हात, शेजाऱ्यानेच केला घात

बहुगुणी डेस्क, वणी: लग्न, रिसेप्शन म्हटलं, दागिन्यांची हौस पूर्ण होते. आपले खास दागिने घालून मिरवण्यास सर्वांनाचाआवडतं. त्यासाठी ठेवणीतले दागिने घेऊन आपण प्रवासाला निघतो. मात्र गर्दीचा फायदा घेत ते दागिने पळवणारे भामटेही असतातच. अशाच एका…

रस्त्यावरील खड्ड्यात पडून निळापूरचा युवक गंभीर जखमी

पुरुषोत्तम नवघरे , वणी: निळापूर-बामणी हा अत्यंत रहदारीचा मार्ग. दिवस-रात्र या मार्गावर अविरत वाहतूक असते. मात्र या रोडवरील मोठमोठाल्या खड्ड्यांमुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांचा जीव सदैव टांगणीला लागलेला असतो. कधी कुणाचा आणि कसा अपघात होईल, हे…

दूर व्हा नाहीतर मरतेच, मुलीच्या उत्तरानं बापालाच पेच

बहुगुणी डेस्क, वणी: 'सोळावं वरीस धोक्याचं' म्हणतात. 'ती' तर त्याहीपेक्षा कमी म्हणजेच 14च वर्षांची आहे. तिचा नजिककच्या एका गावातील युवकावर जीव जडला. प्रेमाच्या आणा-भाका, शपथा झाल्यात. त्यांनी काहीतरी वेगळंच प्लानिंग केलं. मग ठरल्याप्रमाणे…

दहावीच्या परीक्षेत ‘ह्या’ विद्यार्थ्यांनी मारली बाजी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मंगळवारी शालांत परीक्षेचा म्हणजेच दहावीचा निकाल लागला. हा निकाल सर्वांना सुखावणाराच आहे. वणी पब्लिक स्कूल, लायन्स हायस्कूल, 'मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी व अन्य शाळांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. वणी पब्लिक स्कूलचा…

नियम सगळे लावत गेलेत तेल, रस्त्यावरच खोदली ‘त्याने’ बोअरवेल

विवेक तोटेवार, वणी: नगर परिषद कार्यालय परिसर, भाजीबाजार हा अत्यंत वर्दळीचा भाग. मात्र सोमवार दिनांक 12 मे रोजी वणी शहराच्या मध्यभागी ज्योती बार समोर अगदी रस्त्यावर शहरातील एका व्यक्तीने बोअरवे खोदून शासकीय नियमांना धाब्यावर बसवले. या…

‘हा’ आजार रक्तपेशी तयार करणंच बंद करतो, माहिती आहे काय?

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रक्तपेशी ह्या आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्या अहोरात्र नष्ट होत असतात. त्याच बरोबर नव्याने तयारही होत असतात. मात्र त्या बंद झाल्यात तर आरोग्य धोक्यात येतं. थालेसेमिया हा आजार सिकलसेल श्रेणीतला…

महिलांच्या सुरक्षेच्या केवढा हा खड्डा, बसस्टॅण्ड बनला चोरांचा अड्डा

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या लग्नाचा सिझन जोमात सुरू आहे. त्यामुळे बसस्टॅण्ड आणि परिसरात नागरिकांची गर्दीही वाढत आहे. या गर्दीचा फायदा भुरटे चोर घेत आहेत. बसमध्ये चढणाऱ्या किंवा उतरणाऱ्यांचे मौल्यवान दागिने चोरण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच…

मुली आणि महिलांसाठी मोठ्ठी खूशखबर, मोफत करिअर गायडन्स 14 पासून

बहुगुणी डेस्क, वणी: कुटुंबातील, नात्यातील किंवा समाजातील सीनियर सदस्य हे युवकांना मार्गदर्शन करीत असतात. मात्र अनेकदा त्यासाठी योग्य पर्याय देत नाहीत. हे करू नको म्हटल्यावर, हे करू शकता असा पर्याय देणं आवश्यक आहे. नेमकी हीच बाब यवतमाळ…

थांबत नाही घरफोडीचा कल्ला, तोच चोरट्याचा गाडीवर डल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: घरफोडीच्या घटना थांबता थांबेना तोच पुन्हा गाडी चोरट्यांनी आपलं डोकं वर काढलं. वर्षभर गाडीचोरीच्या तुरळक घटनाही सुरू आहेत. कार असो वा बाईक या गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. अगदी सीसीटीव्ही कॅमेरे…

करायला गेला बात; पण त्याचाच पाडला दात

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात वाहतुकीची शिस्त कुणालाच राहिली नाही. त्यातही लग्न किंवा अन्य मिरवणुकींनी ही शिस्त बिघडते. त्यातून छोटे-मोठे अपघात घडतात. वादही होतात. असाच वाद सोमवारी सिद्धी विनायक मंगल कार्यालयाच्या मार्गावर झाला. त्यात आरोपीने…