दहावीच्या परीक्षेत ‘ह्या’ विद्यार्थ्यांनी मारली बाजी

लायन्स, मॅक्रून, वणी पब्लिक, जनता स्कूलचा पाहा निकाल, अनुराधा महालक्ष्मे तालुक्यात अव्वल

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मंगळवारी शालांत परीक्षेचा म्हणजेच दहावीचा निकाल लागला. हा निकाल सर्वांना सुखावणाराच आहे. वणी पब्लिक स्कूल, लायन्स हायस्कूल, ‘मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी व अन्य शाळांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. वणी पब्लिक स्कूलचा सिद्धांत जितेंद्र डगावकर 92% गुण प्राप्त करून विद्यालयात प्रथम आला. लायन्स हायस्कूलची पूर्वा प्रमोद करमनकर हिने 95.80% गुण प्राप्त करून ती शाळेतून प्रथम आली आहे. तर मॅकरुन शाळेची ईशा ढूमणे ही शाळेतून अव्वल आली. वरीला तिन्ही शाळांचे निकाल खालील प्रमाणे आहेत.

वणी पब्लिक स्कूल वणी चा 100%निकाल 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शाळेतून सिद्धांत जितेंद्र डगावकर 92% गुण प्राप्त करून विद्यालयात प्रथम आला. श्लोक उमेश निखार 90.40 गुण प्राप्त करून विद्यालयातून दुसरा आला. ख़ुशी मंगेश बोढाले 88.80 गुण प्राप्त करून तिसरी तर नयन प्रवीण येलपुलवार 88.20 गुण प्राप्त करून विद्यालयात चवथा आला आहे. विद्यालयातील 39 विद्यार्थ्यांपैकी 21 विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत व 17 विद्यार्थी प्रथम श्रेणित उत्तीर्ण झालेत. विद्यालयाचे प्राचार्य राकेश कुमार देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विद्यालयाचे शिक्षक सतीश बविस्कर, सय्यद इम्रान, अनुपली खोब्रागडे, चंदा बोरकर, मंगल तेलंग, सय्यद गौस व शाळेतील सर्व शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले. यामध्ये विज्ञान विषयात विशेष गुण प्राप्त करणारी विद्यार्थीनी कु. ख़ुशी मंगेश बोढाले ही स्वाईल ऑफ स्वाड मुंबई तर्फे दिला जाणाऱ्या कल्पना चावला मेमोरियल अवॉर्डची मानकरी ठरली. तर सिद्धांत जितेंद्र डगावकर याला गणित विषयात सर्वाधिक गुण प्राप्त झाल्याबद्दल स्व. हंसराजजी चचडा मेमोरियल तर्फे दिला जाणाऱ्या आर्य भट्ट पुरस्काराचा मानकरी ठरला.
यशस्वी विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाचे प्राचार्य राकेश कुमार देशपांडे, संस्थेचे सचिव ओमप्रकाशजी चचडा, विक्रांत चचडा व शाळेतील सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांना देत आहेत.

                                                                   वणी लायन्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली
वणी लायन्स इंग्लिश मिडी.हायस्कूलचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 चा 98.64% निकाल लागला. पूर्वा प्रमोद करमनकर हिने 95.80% गुण प्राप्त करून ती शाळेतून प्रथम आली आहे. तर गुणानुक्रमे पोर्णिमा ज्ञानेश्वर ताजणे (95.40), आर्या श्रीकांत निखाडे (94.80), नैतिक संदीप चिडे (94.60), सौम्य चंद्रशेखर नाटकर (94.40), तन्मय राजेश रावेकर (93.60), वेदांत संदीप जुनगरे (93.40), मुफलीया शाहीद खान (92.80), अनिकेत दिवाकर खिरटकर (92.20), अयान राजू निब्रड (92.20), वंशिका व्यंकटेश बांगडे (91.40), समृध्दी सुरेश भोयर (90.40), फैजान फिरोज खान (90.20) व उत्कर्ष राजेश मारोडकर यांनी (90.20) टक्के गुण प्राप्त केलेत. 52 विद्यार्थ्यांनी 75 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त करून प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेत. तर 30 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला एकूण 148 विद्यार्थ्यांपैकी 147 विद्यार्थी झाल्याने शाळेचा एकूण नीकाल 98.64 टक्के लागला
शाळेचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, सदस्य शमीम अहमद, नरेंद्रकुमार बरडिया, किशन चौधरी, महेंद्र श्रीवास्तव, राजाभाऊ पाथ्रडकर , शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्य चित्रा देशपांडे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे.

                                                                मॅकरुन शाळेची ईशा ढूमणे अव्वल तर खुशाल देवलीवार द्वितीय स्थानावर

शहरातील ‘मॅकरून स्टुडंट्स अकॅडमीने’ यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. या परीक्षेत शाळेतील एकूण 63 विद्यार्थी बसले होते. त्यात ईशा ढूमणे हिने दहावीत 93 टक्के गुण प्राप्त करत अव्वल येण्याचा मान पटकावला. मॅकरुन स्टुडन्टस अकॅडमी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपली दरवर्षी ची 100% निकालाची परंपरा कायम ठेवीत यश मिळवले. यामध्ये प्रथम ईशा ढूमणे – 93%, खुशाल देवलीवार -88%,रनक सोनी – 88%, प्रथिनी नागपुरे – ८७%,अर्णवी खडसे – ८७%, श्रेया सातपुते -86%, फाजील खान- ८६%,ऋग्वेद भावसार – ८५% स्वयं चहाणकर -८३%,आदित्य वैद्य -८२%, कृतिका आंबेकर -८२%, गेएशा नागराळे-81% या सर्व विद्यार्थ्यांनी चांगले गुण प्राप्त करून यश संपादन केले. मॅकरुन स्टुडंन्टस अकॅडमीच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या या यशाने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रत्येक विद्यार्थी या यशाचे श्रेय शाळेचे संचालक पी.एस.आंबटकर, उपसंचालक पीयूष आंबटकर, उत्कृष्ट मुख्याध्यापक शोभना मॅम तसेच शिक्षकवृदांना दिले.


                               

                                                                                          जनता शाळेची अनुराधा महालक्ष्मे तालुक्यात अव्वल

माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत जनता विद्यालयाची विद्यार्थीनी अनुराधा अरविंद महालक्ष्मे हीने 98:20 टक्के गुण मिळवून तालुक्यात अव्वल येण्याचा मान मिळवला. फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेला वणी तालुक्यातून 2254 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 2001 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तालुक्यातील 43 शाळांपैकी सहा शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. नेहमीप्रमाणे या वर्षी सुद्धा जनता शाळेने बाजी मारली आहे.

 

Comments are closed.