फुलपाखरू पकडून देण्याचे आमिष दाखवून दोन 6 वर्षांच्या चिमुकलींवर अत्याचार

भास्कर राऊत, मारेगाव: फुलपाखरू पकडून देण्याचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलांनी (विधीसंघर्ष बालक) दोन 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना तालुक्यात उघडकीस आली आहे. दिनांक 19 मार्च रोजी ही घटना घडली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात मुलींच्या पालकांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल कक्यारण्यात आला आहे.

Podar School 2025

प्राप्त माहिती नुसार, दोन्ही अल्पवयीन मुली या तालुतील एका गावातील रहिवासी आहेत. त्यांच्या शेजारीच हे दोन्ही मुले राहतात. यातील एका मुलाचे वय 11 तर दुस-या मुलाचे वय 14 आहे. रविवारी दिनांक 19 मार्च रोजी दुपारी मुली या घराजवळ खेळत होत्या. दरम्यान दोन मुलांनी या चिमुकलींना फुलपाखरू पकडून देण्याचे आमिष दाखवले व त्यांना एका उजाड पडक्या घरात नेले. तिथे या दोन मुलांनी या दोन्ही चिमुकलीवर अत्याचार केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मुली घरी आल्यावर मुलींच्या आजीच्या लक्षात हा प्रकार आला. आजीने हा प्रकार मुलींच्या आईवडिलांना सांगितला. याबाबत मुलींच्या पालकांनी मुलांच्या पालकांना विचारणा केली. अखेर 22 मार्च रोजी मुलींच्या पालकांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी दोन्ही विधीसंघर्ष बालकांवर भादंवि व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. ही घटना उघडकी येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे

घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत करीत आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.