शिबला येथील गुराख्याचा जंगलात मृत्यू

0

सुशील ओझा, झरी:– तालुक्यातील शिबला येथील ३५ वर्षीय वर्षीय मारोती भीमराव तुमराम गुराखी गावातील लोकांची जनावरे चरायला नेण्याचे काम करतो. मंगळवारी नेहमीप्रमाणे गुरे चारण्याकरिता निमनी जंगल शिवारात गेला.

Podar School 2025

तो रात्री परत आला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी शोधाशोध सुरू केली. तेव्हा नजिकच्या जंगलात मारोतीचा मृतदेह आढळला. यावरून पोलिसांनी माहिती घेतली असता सदर गुराखी हा सतत तीन दिवसांपासून पावसात गुरे चारण्याकरिता नेत होता. त्याला थंडी लागली व तो अकडून मेल्याचा तर्क काढण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

विशेष म्हणजे मृतकाच्या शरीरावर कोणत्याही जखमा व मारण्याचे निशाण नव्हते. घटनेची माहिती मुकुटबन पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहचून पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. पुढील तपास ठाणेदार धर्मराज सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रवीण ताडकोकुलवार व संदीप बोरकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.