पोलीसच सापडला दारू तस्करीत, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेलोरा चेकपोस्टवर शिरपूर पोलिसांची कारवाई

0

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथून दारूबंदी असलेले चंद्रपूर जिल्ह्यात विदेशी मद्य नेताना एका पोलीस शिपायाला अटक करण्यात आल्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. आरोपी पोलीस शिपाई चंद्रपूर पोलीस मुख्यालयात ड्युटीवर असून त्याचा नाव मोरेश्वर दिलीप गोरे (34) आहे.

प्राप्त माहितीनुसार लॉकडाउनच्या अनुषंगाने चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर बेलोरा येथे पोलीस चेकपोस्ट बसविण्यात आले आहे. बुधवारी दुपारी 12 वाजता दरम्यान वणी येथून चंद्रपूरकडे जात असलेले टाटा सफारी वाहन थांबवून पोलीस कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता आरोपी वाहन चालकाने मी स्वतः पोलीस असल्याचे सांगून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीच्या हालचालींवर शंका आल्यामुळे पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीत विदेशी दारूच्या 12 बंपर आढळले.

पोलिसांनी लगेच आरोपीला अटक करून टाटा सफारी वाहनांसह शिरपूर पोलीस स्टेशनला आणले. शिरपूर पोलिसांनी आरोपी कडून 12 बंपर विदेशी मद्य किंमत 16 हजार व टाटा सफारी वाहन किंमत 4 लाख, असा एकूण 4 लाख 16 हजाराचे मुद्देमाल जप्त केले आहे. आरोपी विरुद्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आले. आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांला सुचनेपत्रवर सोडण्यात आल्याची माहिती आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असून दारू तस्करी रोखण्याची जवाबदारी पोलिसांची आहे. परंतु पोलीस कर्मचारीच दारू तस्करी मध्ये संलग्न असल्यामुळे पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!