छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त वणीत रक्तदान शिबिर

गुरुवारी नंदेश्वर देवस्थानात आयोजन, पूर्वनोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

0

विवेक तोटेवार, वणी: छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड व नंदेश्वर देवस्थान वणी यांचे संयुक्त विद्यमाने वणीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवारी दिनांक 14 मे 2020, रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत नंदेश्वर देवस्थान, वरोरा रोड, वणी येथे घेण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शिबिरासाठी पूर्व नोंदणी करणे गरजेचे आहे. इच्छकांना नोंदणीसाठी खालील ठिकाणी संपर्क साधता येऊ शकतो.

नोंदणीसाठी संपर्क:
१) अजय धोबे 9673034116; 9637598516. २) विवेक ठाकरे ३) देव येवले ४) लहु जिवतोडे ५) अमोल टोंगे ६) दत्ता डोहे ७) आषिश रिंगोले ८) अभय पानघाटे ९) विजय दोडके १०) केतन ठाकरे ११) प्रमोद लडके

Leave A Reply

Your email address will not be published.