मुस्लिम बांधवांसोबत ईद साजरी

मुस्लिम बांधवांना महात्मा फुले आरोग्य योजनेबाबत मार्गदर्शन

0 303
कारंजा: वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाचे संचालक व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी ईद उल फित्र सण मुस्लिम बांधवांसोबत साजरा केला. बुधवारी सकाळी ९ वाजता ईदगाह मैदानात ईद उल फित्रची सामुहिक नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर ईदगाह जवळ अनेक मुस्लिम बांधवासमवेत त्यांनी ईद साजरी केली. डॉ श्याम जाधव (नाईक) यांनी समस्त मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देऊन ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी कारंजा शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोनोने, पोलीस निरीक्षक जाधव साहेब यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अरविंद लाठीया, शेख अब्दुल राजिक, एडवोकेट संदेश जिंतुरकर, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय नाईक व सामाजिक कला व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. जाधव यांनी दिग्रस येथील संत डॉक्टर रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू झाल्याची माहिती दिली. त्या योजने अंतर्गत येणाऱ्या 971 आजारांवर मोफत उपचार व मोफत शस्त्रक्रिया केली जाते. याचा लाभ कारंजा, मानोरा परिसरातील केसरी व पिवळे रेशन कार्ड धारकांनी तसेच सातबारा धारकांनी घ्यावा असे आवाहन डॉ. श्याम जाधव यांनी केले.

Comments
Loading...