वणी शहरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

पावसामुळे परिसरात गारवा, वणीकरांना दिलासा

0 1,476
विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात शुक्रवारी संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. अनपेक्षित आलेल्या पावसाने अनेकांना सुखाचा धक्काच दिला. जीव होरपळावा असा उकाडा व तापमान उन्हाळ्यात नेहमीच असते. पण अचानक आलेल्या या पावसाने क्षणभर का होईना उन्हाने त्रस्त झालेल्या जीवांना सुखद दिलासा मिळाला असून काही प्रमाणात उकाड्यापासून सुटका झाली आहे.
आठवड्याभरापासून वणीत तुरळक वादळी वा-यासह तुरळक पाऊस येत होता. मात्र आज शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास वणी शहरात वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. सुमारे पाऊन तास पाऊस सुरू होता. त्यामुळे उन्हामुळे तापलेल्या शहरात आज पुरता का होईना गारवा आला आहे. उद्या जर पुन्हा पाऊस आला नाही तर वातावरण दमट होऊन पुन्हा उकाड्याचा त्रास सहण करावा लागू शकतो.
गेल्या आठवड्यापासून वणी व परिसरात ढग दाटून यायचे. वादळी वा-यासह तुरळक पाऊसही यायचा. मात्र त्यामुळे आजचा पाऊस हा गेल्या आठ दिवसातला सर्वात दमदार पाऊस होता. या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे व रस्त्यावर काही प्रमाणात चिखल झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वणीकर पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर गुरुवारच्या पावसाने सर्वांनाच सुखावले हे नक्की.
Comments
Loading...