मनभा येथे पंकजपाल महाराजांचे कीर्तन संपन्न

डॉ. श्याम जाधव (नाईक) यांचा करण्यात आला नागरी सत्कार

0

कारंजा: तालुक्यातील मनभा येथे मंगळवारी दिनांक 17 सप्टेंबर रोजी सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकजपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छता, अंधश्रद्धा, जातिभेद, व्यसनमुक्ती, घनकचरा नियोजन, स्त्री भ्रूणहत्या, शिक्षणाचे महत्त्व, हगणदारी मुक्त गाव या विषयी उपस्थितांचे प्रबोधन केले. या कार्यक्रमात सामाजिक कार्याबाबत डॉ. श्याम जाधव (नाईक) यांचा सत्कार ही करण्यात आला.

संध्याकाळी ठिक 8 वाजता नागा बाबा मंदिर परिसरात कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी पंकजपाल महाराज म्हणाले की गाव स्वच्छ राहणे अत्यंत गरजेचे आहे. अस्वच्छतेमुळे रोगाची लागण होते. त्यामुळे घरोघरी संडास होणे गरजेचे आहे. अंबाणी आपल्या बायकोला वाढदिवसाला विमान भेट देऊ शकतो तर तुम्ही तुमच्या घरवालीसाठी साधा संडास बांधून देऊ शकत नाही का असा प्रश्नही त्यांनी आपल्या कीर्तनातून केला. या सोबतच त्यांनी शिक्षण, सामुहिक विवाह, व्यसनमुक्ती याविषयावरही लोकांचे प्रबोधन केले.

यावेळी डॉ. श्याम जाधव (नाईक) यांचा सामाजिक व आरोग्य विषयक कार्याबाबत नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले की…

महाराष्ट्राला लोककलेची, लोकसंस्कृती मोठी परंपरा आहे. मनोरंजनातून प्रबोधन हा लोककलेचा मुख्य उद्देश आहे. गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यानंतर विदर्भात सत्यपाल महाराज हा वसा पुढे चालवला आहे. त्यांचे प्रबोधनाचे कार्य आज त्यांचे शिष्य पंकजपाल मोठ्या हिरारिने पुढे नेत आहे. आज आदर्श गावासाठी तुकडोजी महाराजांच्या ग्रामगितेचे आचरण होणे गरजेचे आहे. असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशांत ढगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी मनभा येथील रहिवाशांसह परिसरातील ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!