सामाजिक उपक्रमांनी संजय खाडे यांचा वाढदिवस संस्मरणीय

रक्तदानापासून वृद्धाश्रम भेटीपर्यंत… वणीमध्ये समाजसेवेचा उत्सव

बहुगुणी डेस्क, वणी: शेतकरी, कामगार नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांचा वाढदिवस यंदा सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. रक्तदान, वृद्धाश्रमात साहित्य वाटप, रुग्णालयात फळवाटप तसेच नव्या व्यावसायिक उपक्रमाच्या उद्घाटनामुळे दिवसभर वणीत सामाजिक आणि उत्सवी वातावरण पाहायला मिळाले.

Birthday

सकाळच्या सत्रात शेतकरी मंदिर, वणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात युवकांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिरात 100 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. लाईफलाईन रक्तपेठी, नागपूर यांच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संजय खाडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुपारच्या सत्रात वणीजवळील पळसोनी येथील बाजीराव वृद्धाश्रमात साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. वृद्धांना कपडे, चप्पल तसेच दैनंदिन वापरातील आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करून सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला.

नव्या प्रवासाची सुरुवात
संध्याकाळी 6 वाजता खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते धनंजय खाडे संचालित “डीएसके कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स” या नव्या व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत नव्या व्यावसायिक प्रवासाला शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता शेतकरी मंदिर येथे अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहून संजय खाडे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी वणी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच संजय खाडे मित्रपरिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.