राजूर येथे अवैध मटका व्यवसाय जोमात

मटका बंद असल्याचा पोलीस प्रशासनाचा दावा खोटा

0
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर या ठिकाणी अवैध समजला जाणारा मटका व्यवसाय जोमात सुरू आहे. पोलीस प्रशासन याबाबत मूग गिळून बसले आहे. एकीकडे पोलीस प्रशासन मटका व्यवसाय शंभर टक्के बंद झाल्याचा दावा करीत आहेत. मात्र दुसरीकडे  राजरोजपणे अवैधरित्या मटका सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे.
वणीत नव्याने रुजू झालेले ठाणेदार वैभव जाधव येताच वणीतील अवैध मटका व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात आले. कधी राजरोपसपणे तर कधी छुप्या मार्गाने चालणार हा व्यवसाय बंद करण्यात ठाणेदाराला यश आले. परंतु त्यांच्यासोबत त्यांची व्यवस्था काम करीत नसल्याचे दिसून येत आहे. कारण वणीपासून अगदी जवळच असलेल्या राजूर येथे मोठया प्रमाणात मटका जुगार सुरू असल्याची माहिती आहे. यावर असे दिसून येते की वणीत जरी मटका जुगार बंद असला तरी वणीच्या आजूबाजूच्या गावात हा जुगार भरत आहे. यात काही प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे आर्थिक हित जोपासल्या जात आहे. की या व्यवसायाला आणखी कुणी राजकीय नेत्यांच्या आशीर्वाद आहे हे अजून स्पष्ट नाही.
या व्यवसायात अनेक तरुण अडकले आहे. त्यामुळे तरुण पिढीचे भविष्य पूर्ण अंधारात आहे. त्यातच हा जुगार खेळणाऱ्यांमध्ये गरीब मजूर वर्ग अधिक आहे. लवकर व विनामेहनातीने श्रीमंत होण्याच्या नादात हा गतीब वर्ग अधिकाधिक पैसे लावतो परंतु त्याच्या नशिबी निराशाच येते. कवरण मटका घेणारच मोठा होत असतो लावणारा नाही. हे तितकेच सत्य आहे. या मटका जुगारामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागले आहे. काही उध्वस्त झाले आहे. त्यामुळे हा व्यवसाय हद्दपार करावा अशी मागणी जोर धरत आहे. यानंतर या मटका व्यावसायिकांवर पोलीस केव्हा कारवाई करेल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान अवैध मटका सुरू असल्याची व्हिडीओ क्लिप वणी बहुगणीच्या हाती आली आहे.
लिंकवर व्हिडीओ…

Leave A Reply

Your email address will not be published.