बहुगुणी डेस्क,अमरावतीः गीतकार गुलजार यांच्या निवडक गीतांची मैफल सिंफनी ट्यून्स स्टुडिओने आयोजित केली. ‘बाकी रंग गुलजार के संग’ या शीर्षकाखाली ही मैफल रंगली. अमरावती येथील कलोतीनगर स्थित सिंफनी ट्यून्स स्टुडिओमध्ये याचे रेकॉर्डिंग झाले. या ऑनलाईन मैफलीला रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
संजय व्यवहारे आणि अरविंद व्यास यांनी गायलेल्या ‘तुम पुकार लो’ या गीताने मैफलीचा आरंभ झाला. त्यानंतर ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही’ हे गीत डॉ. नयना दापूरकर यांनी पेश केलं. गुरूमूर्ती चावली यांनी आपल्या अनोख्या शैलीत ‘सुरमयी अखियों में’ हे गीत गायलं. ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास’ ही रचना पल्लवी राऊत यांनी गाऊन एका वेगळ्या उंचीवर नेली.
‘दिन कुछ ऐसे’ या अरविंद व्यास यांनी गायलेल्या गीताने मैफलीत रंग भरला. सिरिषा चावली यांनी आपल्या वेगळ्या अंदाजात ‘ऐ दिल मुझे बता दे’ गीत गाऊन रसिकांची मने जिंकलीत. ‘तुझ से नाराज नही जिंदगी’ हे गीत डॉ. नयना दापूरकर यांनी गायलं. ‘मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने’ हे गीत आपल्या दमदार आवाजात संजय व्यवहारे यांनी गायलं. ‘मेरी आवाज ही पहचान है’ या पल्लवी राऊत यांनी गायलेल्या गीताने मैफलीची सांगता झाली.
कार्यक्रमाचं बहारदार आणि अभ्यासपूर्ण निवेदन नासीर खान आणि प्रीती मिश्रा यांनी केलं. पियानोची साथ सचिन गुडे यांनी केली. तबल्याची साथ विशाल पांडे आणि अॅकॉर्डियनची साथ गजानन देउळकर यांनी केली. संगीत संयोजन सुनीत बोरकर यांचं होतं. चित्रिकरण अमिन गुडे यांनी केलं. तांत्रिक सहकार्य भूषण बारबुद्धे यांचं होतं.
संपूर्ण कार्यक्रम मोफत बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/watch?v=AQsVjsh3tvY