बेपत्ता झालेल्या तरुणाचा अखेर सापडला मृतदेह

पेंढरी येथील तरुणाची आत्महत्या

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील पेंढरी येथील एका तरुणाचा आज मंगळवारी दिनांक 8 जून रोजी मृतदेह आढळला. पेंढरी येथील शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत हा तरुण आढळला. मंगल शामराव कुमरे असे या तरुणाचे नाव आहे. कालपासून तो बेपत्ता होता. मात्र आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.

मंगल शामराव कुमरे (26) याला आई वडील हयात नसल्याने तो काकांकडे पेंढरी येथे राहायचा. काकाला शेतीच्या कामात तो मदत करायचा. तो काल घरून निघून गेला होता. तेव्हापासून त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. पेंढरी शिवारात लक्ष्मण कुमरे यांचे शेत आहे. लक्ष्मण हे आज शेतात गेले असता त्यांना शेतातील एका झाडावर मंगलचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

लक्ष्मण यांनी तातडीने याची माहिती गावातील पोलीस पाटलांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा केला. गेल्या काही दिवसांपासून मंगल हा आर्थिक विवंचनेत असल्याचे मृतकाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप टू डेट

दारूची अवैधरित्या वाहतूक करणा-या तरुणाला अटक

अखेर दीड महिन्यानंतर मृत्यूशी झुंज थांबली

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!