उंबर्डा बाजार येथे महाआरोग्य शिबिर

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांची तपासणी

0

कारंजा: तालुक्यातील उंबर्डा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी दिनांक 25 जुलै रोजी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. हे शिबिर सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत घेण्यात आले. संत श्री डॉ रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक डॉ श्याम विजय जाधव (नाईक) यांच्या मार्गदर्शनात या मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 327 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यात आरोग्यधाम हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध आजारांवर रुग्णांची तपासणी केली.

या वेळी संत श्री डॉ रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल तर्फे महात्मा फुले जन आरोग्य योजने बद्दल यथोचित मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपल्या आरोग्याची निगा कशी राखावी व आरोग्यमय जीवन शैली कशी अंगिकारावी याविषयी डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. या महाआरोग्य शिबिराला उंबर्डा बाजार गावचे सरपंच वनिता नागोलकर , विजय नाईक, वैद्यकीय अधिकारी डॉ.भाऊसाहेब लहाने,डॉ महेंद्र बाजड,डॉ अनिल चव्हाण,पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अनिरुद्ध जाधव,उपस्थित होते.

महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत पिवळे तसेच केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबाला वार्षिक दिड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाते. यात 971 प्रकारच्या आजार व 121 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. यामध्ये डायलिसीस, मेंदुविकार, हृदयरोग, हाडांचे आजार, किडनीचे आजार, कान-नाक-घशाचे आजार, महागड्या शस्त्रक्रिया यांचा समावेश आहेत. तसेच यात रुग्णांना मोफत औषधीही दिली जाते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!