कारगिल विजय दिनानिमित्त भुली येथे वृक्षारोपण

वृक्षारोपण करून शहिदांना अभिवादन

0

मानोरा: मानोरा तालुक्यातील भुली येथील जय बजरंग विद्यालयात शुक्रवारी दिनांक 26 जुलै रोजी कारगिल विजय वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संत श्री डॉ रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक तथा वाशिम जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ श्याम जाधव (नाईक) यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी करंजी, अर्जून, सप्तपर्णी, रेनट्री इत्यादी वृक्षरोपणाची झाडे लावण्यात आली. शहिदांच्या स्मृती कायम जागृत राहण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रत्येक झाड दत्तक घेऊन ते जगवण्याची शपत घेण्यात आली. कार्यक्रमात टी. व्ही. राठोड, विजय नाईक, प्रकाश राठोड यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.