पावसाळ्यात घरात माशा वाढल्या ? हे उपाय करा

दूर ठेवा माशा, रोगराई पासून बचाव करा

0

पावसाळा आला की सोबत मोठ्या प्रमाणात रोगराई येते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वातावरणात बदल आणि डास, माशांची उत्पाद, माशांमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. मोठ्यांना तर याचा त्रास होतोच पण लहान मुलांवर याचा जास्त परिणाम बघायला मिळतो. माशा बाहेरून घरात रोगजंतू घेऊन येतात. त्या माशा अन्नावर बसल्या की त्याने आपल्याला रोगांचा सामना करावा लागतो. यामुळे डिसेंट्री, टायफाईड, कॉलरा आणि गॅस्ट्रोइंट्रीटीस यांचा धोका वाढतो. या रोग पसरवणा-या माशांपासून सुटका कशी करावी यासाठी काही खास टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत.

स्वच्छता:

घरात सर्वात जास्त जर माश्या कुठे येत असतील तर त्या किचनमध्ये असतात. त्यामुळे किचनमध्ये काहीही घाण ठेवू नये. किचन सतत स्वच्छ करत रहावं. उघड्यावर खाण्याच्या वस्तू ठेवू नये. ब्लिच बेस्ड किंवा क्लोरिन बेस्ड क्लिनर्सने ओटा स्वच्छ ठेवा. अन्न सांडवू नका. सांडल्यास ती जागा लगेच स्वच्छ धुवून घ्या. त्यासोबत घरातील कचरा उघडा ठेवू नका. शक्यतो तो लवकर बाहेर टाका. अन्न झाकून ठेवा.

दारं खिडक्या बंद करा:

पावसाळ्यात शक्यतो घराच्या खिडक्या आणि दारं बंद ठेवा. बाहेरून आल्यावर पाय निट स्वच्छ धुवा. किंवा खिडक्यांना जाळी, मच्छरदाणी लावा. यामुळे तुम्ही खिडक्या अधिक वेळ उघड्या ठेवू शकता.

इंसेक्ट रेपेलंट स्प्रे मारा:

घरात किटकांचा वावर कमी करण्यासाठी इंसेक्ट रेपेलंट स्प्रे मारा. मात्र त्याचा वापर करताना घरातील लहान मुलं तसेच खाण्याचे पदार्थ दूर ठेवा. बाजारात आणखीही काही केमिकल्स मिळतात ते वापरा. पण लहान मुलांना त्यापासून दूर ठेवा.

घरगुती उपाय:

कापूर, तुळस, कडूनिंब, तेल : धार्मिक कार्यामध्ये कापूर वापरला जातो. संध्याकाळी धूपासोबत कापूर जाळल्यास माश्या कमी होतात. घरात चारही कोपर्‍यात कापराच्या गोळ्या टाका. माश्या खूप असतील तर कापूर जाळा. कापराच्या दर्पामुळे माशा कमी होण्यास मदत होते. घरा-घरात किमान तुळशीचं रोप जरूर आढळतं.

तुळशीमधील औषधी गुणधर्मासोबत किटकांना दूर ठेवण्याची क्षमतादेखील आहे. घरात तुळशीचे रोप लावल्यास माश्यांचा वावर कमी होतो. त्यासोबतच निलगिरी, लव्हेंडर, पेपरमिंट, गवती चहा यासारखी नैसर्गिक तेलांनी किटकांना दूर ठेवण्यास मदत होते. या तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवून तो हवाबंद डब्ब्यात ठेवा. ज्याठिकाणी कीटक असतात तेथे हा डबा उघडा करून ठेवा.

Leave A Reply

Your email address will not be published.