तेजापुर येथे भोंदुबाबाचा भांडाफोड

जगन्नाथ बाबाचा अवतार असल्याचे सांगून उकळत होते पैसे

0

देव येवले, मुकुटबन: मंगळवारी तेजापूर येथे तरुणांच्या पुढाकाराने भोंदुबाबांचा भांडाफोड करण्यात आला. या व्यक्ती जगनाथ बाबांचा अवतार असण्याचे सांगून स्थानिकांकडून देणगीच्या नावाखाली पैसे गोळा करत होते. अडेगाव येथील संभाजी ब्रिगेटच्या कार्यकर्त्यांना या भोंदुंचा पर्दाफाश केला. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

मंगळवारी तेजापूरमध्ये दोन अज्ञात व्यक्ती विठ्ठलवाडा, जिल्हा चंद्रपूर येथील जगन्नाथ बाबांच्या मठाच्या बांधकामाकरिता पावती बुक घेऊन देणगी गोळा करीत होते. हे व्यक्ती त्यातील एकाला जगन्नाथ  बाबांचा अवतार असल्याचे सांगून 500 ते  3 हजार रुपयांपर्यंत रक्कम वसूल करत होते. देणगी देण्यास नकार दिल्यास बरेवाईट होईल अशी भीती देखील ते दाखवत होते.

ही बाब गावातील काही युवकांच्या लक्षात आली. त्यांनी अडेगाव येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांशी लगेच संपर्क साधला. संभाजी ब्रिगेडचे लगेच तेजापूरला पोहोचले. त्यांनी बाबाला गाठून बाबांचा भंडाफोड केला. त्यांच्याकडून गावातून जमा केलेली रक्कम 17,850 व स्मार्टफोन जप्त केला. जप्त केलेली रक्कम सर्वानुमते  गावात निर्माण होत असलेल्या वाचनलयास देण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला.

भांडाफोड करण्याकरीता गावातील ठगसेन पेंदोर,  आशिष मालेकर,  मनोज कोंडेकार,  गणेश मालेकार, पुरुषोत्तम बांदुकार, रविंद्र क्षीरसागर आदी युवकांनी तर संभाजी ब्रिगेड झरी तालुकाध्यक्ष प्रशांत बोबडे व त्यांचे सहकारी मित्रांनी पुढाकार घेतला.

संभाजी ब्रिगेडचे झरी तालुकाध्यक्ष वणी बहुगुणीशी बोलताना म्हणाले की…
जो पर्यंत बहुजन समाजाची मानसिकता बदलणार नाही तो पर्यंत ढोंगी बाबांचे असले प्रकार होत  राहील. जर असे प्रकार बंद करायचे असेल तर विचार करण्याची ताकत आपल्यातच निर्माण करावी लागेल. आज तरुणांनी केलेले कार्य खरोखरच परिवर्तनशील आणि अभिमानास्पद आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.