शरीराला व्यायाम का आहे गरजेचा ?

जाणून घ्या कोणते व्यायाम करावे

0

सध्या वाढत्या वजनामुळे सर्वच त्रस्त आहेत. सारखं बैठे काम करणं. जंक फुड खाणं, तणाव, पायी चालणं फिरणं बंद इत्यादी कारणांमुळे वजन वाढण्याचं प्रमाण वाढलंय. दहा पैकी एक व्यक्ती तरी ओव्हरवेट दिसतो. वाढती जाडी दूर करायची असल्यास व्यायामासाठी दिवसातील अर्धा तास तरी काढायला हवा.

Podar School 2025

कोणते व्यायाम करावे ?

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

  • शरीरातील विविध अवयवांना व्यायाम घडवून देणारा साईड प्लॅक हा व्यायाम विशेष उपयुक्त ठरतो. यामुळे चरबी जळायला मदत होते. या व्यायामामुळे खांदे, छाती आणि पोटाच्या मांसपेशी मजबूत होतात आणि अतिरिक्त चरबी जळून शरीर सुडौल होतं.
  • महिलांसाठी पुश अप हा व्यायाम महत्त्वाचा ठरतो. या व्यायामामुळे खांदे मजबूत होतात. त्याचप्रमाणे स्तनांचा आकार सुधारतो.
  • घरच्या घरी व्यायाम करायचा असेल तर एक्झरसाईज बॉलचा आधार घेणे योग्य ठरते. या बॉलच्या सहाय्याने साधे सोपे व्यायाम करता येतात.
  • पोहणे हा देखील एक उपयुक्त व्यायाम आहे. आठवड्यातून तीन दिवस पोहण्याचा व्यायाम केला तरीदेखील पुरेसे ठरते. पोहण्यामुळे सर्वांगाला व्यायाम मिळतो त्याचप्रमाणे हाडे मजबूत होतात.
  • जोरात धावणे हा देखील शरीर सुडौल करण्यासाठी कामी येणारा व्यायाम आहे. दररोज १00 मीटर धावणे आणि २५ मीटर चालण्याने शरीर सुडौल होते.
  • नौकासन या आसनाने पोट, दंड आण मांडीवरची अतिरिक्त चरबी जळण्यास मदत होते. हा व्यायामही घरच्या घरी करता येण्यासारखा आहे.

(केस धुण्याआधी केसांची घ्या ‘ही’ काळजी)

Leave A Reply

Your email address will not be published.