पुरी येथे “भगवान जगन्नाथ”ची रथयात्रा सुरू

रथयात्रेसाठी कडेकोट सुरक्षा...

0

जितेंद्र कोठारी: ओडीसा राज्यातील पुरी येथील जगप्रसिद्द “भगवान जगन्नाथ” ची नऊ दिवसीय रथयात्रा आज कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात सुरु झाली. ढोल, ताशे आणि हरीबोलच्या जयकारासह विशाल रथांवर आरूढ भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्राचे वेगवेगळे रथ शनिवारी निघाले.

या प्रख्यात यात्रेत सहभागी होण्यासाठी देश परदेशातून लाखो भाविक पुरी येथे पोहचले आहे. भगवान श्री जगन्नाथ मंदिरापासून गुंडीचा मंदिराकडे जाण्याच्या तीन किलोमीटर लांब रस्त्यावर आज सकाळीपासून हजारो भाविक या जगप्रसिद्द रथयात्रेला बघण्यासाठी जमा झाले आहे. भगवान जगन्नाथ त्यांचे मोठे बंधू भगवान बलभद्र आणि बहिण देवी सुभद्रा यांची प्रतिमा मंदिराच्या गर्भगृहातील रत्नवेदीतून बाहेर काढण्यापूर्वी आज सकाळी वैदिक मंत्रोचार नंतर गोपालभोग लावण्यात आले होते.

त्यानंतर मंदिराच्या सेवादारानी शंखनाद आणि हरीबोलचे जयघोष करीत कडक सुरक्षा बंदोबस्तात भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा याला खांद्यावर घेऊन मंदिराच्या मुख्यदाराजवळ उभे असलेले रथापर्यंत आणले.

Ankush mobile

रितीरिवाजानुसार सर्वात पहिले भगवान जगन्नाथाचे मोठे बंधू भगवान बलभद्र यांना रत्नवेदीतून बाहेर काढून त्यांचे 14 चाकी रथ ‘तलध्वज’ वर विराजमान करण्यात आले, त्यानंतर भगवान जगन्नाथची बहिण देवी सुभद्रा यांना त्यांचे 12 चाकी रथ ‘देवदालान’ मध्ये विराजित करण्यात आले. शेवटी भाविकांमध्ये कालिया नावाने प्रसिद्द भगवान श्री जगन्नाथ यांना त्यांचे 16 चाकी विशाल रथ ‘नंदिघोष’ वर विराजमान करण्यात आले.

One Day Ad

पारंपारिक वाध्ययन्त्राच्या ध्वनीमध्ये भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथचे विशाल रथाला मोठ्या रस्सीने बांधून हजारो भाविक खेचून गुंडीचा मंदिरापर्यंत नेणार आहे. अशी मान्यता आहे कि गुंडीचा मंदिर भगवान जगन्नाथच्या मावशीचे घर आहे.

भगवान श्री जगन्नाथ यांना भगवान विष्णूचे अवतार मानले जाते जे 16 कलाचे ज्ञाता आहे. पुरी हे हिंदू धर्माचे पवित्र चारधाम बद्रीनाथ, द्वारका, रामेश्वरम आणि जगन्नाथपुरी मधील एक धाम आहे.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!