जिल्हाधिकार्‍याच्या मुलीचा सरकारी शाळेत प्रवेश !

कलेक्टरनी 'करून दाखवलं...'

0

नवी दिल्ली: एकीकडे सरकारी अधिकारी आपल्या पाल्याचा प्रवेश सरकारी शाळेत घेण्याऐवजी खासगी शाळांमधून घेण्याची प्रथा रुढ झाली आहे. तर दुसरीकडे छत्तीसगडमधील एका जिल्हाधिकार्‍यांने आपल्या पाच वर्षीय मुलीचा प्रवेश सरकारी शाळेत केला आहे. अवनीश कुमार असे या जिल्हाधिकार्‍याचे नाव असून, त्यांच्याकडे छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्याची जबाबदारी आहे.

वास्तविक, अवनीश कुमार यांची ही कृती पहिली नाही. तर या आधी त्यांनी आपल्या मुलीला केजीसारख्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करण्याऐवजी, अंगणवाडीमध्ये प्रवेश घेणे पसंत केले होते. आता त्यांनी आपल्या पाच वर्षांच्या मुलीचा बलरामपूरमधील प्रज्ञा प्राथमिक विद्यालयात प्रवेश घेतला आहे.

प्रज्ञा प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना हायटेक पद्धतीने शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी वर्गांमध्ये एलईडी मॅनिटर बसवण्यात आले आहेत. तसेच शिक्षकांनाही हायटेक शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलंय. सध्या जिल्ह्यातील सहा ब्लॉकमध्ये ही हायटेक शिक्षणाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांच्या या पुढाकाराने सरकारी शाळांमधील शिक्षणाची स्थिती सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पण अवनीश कुमार यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.