एअर इंडियाच्या प्रवासात आता मिळणार नाही नॉनव्हेज
प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्येही कपात करण्याचा धडाका
नवी दिल्ली: एअर इंडियाच्या इकॉनॉमी क्लासमधील प्रवाशांना दिले जाणारे ‘नॉन व्हेज’ जेवण आता न देण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे. त्यामुळे यापुढे एअर इंडियाच्या विमानाच्या इकॉनमी क्लासमधून देशांतर्गत प्रवास करणार्या प्रवाशांना ‘नॉनव्हेज’ पदार्थ मिळणार नाही. आर्थिक अडचणीत असलेल्या एअर इंडियाने प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्येही कपात करण्याचा धडाका सुरू लावला आहे.
विदेशात प्रवास करणार्या प्रवाशांना नॉनव्हेज जेवण मिळणार आहे. ‘इकॉनामी क्लास’मधून देशांतर्गत प्रवाशांना नॉनव्हेज जेवण न पुरविण्याचा निर्णय आम्ही दोन आठवड्यांआधी घेतला होता. या निर्णयामुळे आमच्या वार्षिक ७- ८ कोटी रुपयांची बचत होऊ शकते, असे अधिकार्यांनी सांगितले.