गुगल आणि मायक्रोसॉफ्ट करणार डासांचा नायनाट

नवीन हायटेक उपकरण बनविण्याचं काम सुरू

0

वॉशिंग्टन: अनेक जीवघेणे आजार हे डासांमुळे होतात. जगभरात अनेक व्यक्तींना केवळ डासांमुळे झालेल्या आजारामुळे जीव गमवावा लागतो. मात्र आता यापासून सुटका करण्यासाठी दोन बड्या कंपन्या एकत्र आल्या आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि गूगलतर्फे एक अनोखे तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. रॅकेटच्या साह्याने, डास मारण्याचे औषध लावून किंवा वेळप्रसंगी फॅनचा आधार घेऊन डासांना पळवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र यासाठी करावी लागणारी धडपड अनेकदा राग आणणारीच असते. मात्र यावर काही ठोस उपाय आल्यास जगभरातील नागरिकांची डासांच्या त्रासापासून सुटका होणार आहे.

मायक्रोसॉफ्ट आणि गूगलची पॅरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेट ही कंपनी अमेरिकेतील सार्वजनिक आरोग्य विभागासोबत काम करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे डासांचा नायनाट करण्यासाठी एकत्रितरित्या काम करुन नवे हायटेक उपकरण बनविण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत.

मायक्रोसॉफ्ट कंपनी एडिस इजिप्ती या डासाला पकडण्यासाठी टेक्सासमध्ये एक ट्रॅप बनविण्याचे काम करत आहे. या डासांमुळे डेंग्यू होत असल्याने ते आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. मात्र या स्मार्ट ट्रॅपमुळे किटक विज्ञान शास्त्रज्ञांना मदत होणार असून, साथीच्या आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. या मशिनचा आकार पक्ष्यांच्या पिंर्ज‍याएवढा असून, त्यामध्ये विविध उपकरणे लावण्यात आली आहेत. यात रोबोटिक्स, इन्फ्रारेड सेन्सर आणि मशीन लनिर्ंग आणि क्लाऊड कॉम्प्युटिंग यांचा समावेश आहे. या सर्व उपकरणांच्या माध्यमातून आरोग्य अधिकारी डासांवर नजर ठेऊ शकणार आहेत.

Ankush mobile

पारंपरिक मच्छरदाण्यांमध्ये डास पकडले जातात. मात्र ते एकत्र होत असल्याने त्यांचे प्रकार ओळखण्यासाठी शास्त्रज्ञांना जास्तीचे कष्ट घ्यावे लागतात. मात्र आता या नव्या उपकरणामुळे हे काम सोपे होणार असून, डासांच्या प्रकारानुसार त्याचे वर्गीकरण केले जाणार आहे. त्या विशिष्ट किटकाचे फिचर, त्या किटकाची पंख फडफडविण्याची पद्धत आणि त्याची पडणारी सावली याचा विचार शास्त्रज्ञ करणार आहेत.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!