Birthday ad 1

कॉकटेल पीत आहात ? सावधान….

तरुणाल कॉकटेल पिणं पडलं महागात, पोटाला पडलं छिद्र

0
veda lounge

नवी दिल्ली: बारमध्ये जाऊन एखादे कॉकटेल घेणे त्याच्यासाठी नेहमीचेच. मात्र त्यादिवशी तो बारमध्ये गेला आणि त्याने नायट्रोजन असणारे एक कॉकटेल घेतल्याने त्याच्या पोटाला चक्क खड्डा पडला. आता ही अतिशयोक्ती वाटत असली तरीही ते खरे आहे. दिल्लीमध्ये राहणार्‍या ३0 वर्षीय तरुणासोबत हा प्रकार घडला असून एखाद्या गोष्टीचा आनंद घेणे जीवावर बेतू शकते हेच यानिमित्ताने समोर आले आहे.

हा द्रवरूपी नायट्रोजनचा धूर गेल्यानंतर कॉकटेल प्यायचे आहे हे लक्षात न आल्याने या तरुणांने धूरासकटच कॉकटेलचं सेवन केलं. पांढर्‍या रंगाचा धूर असणारे हे कॉकटेल घेतल्यानंतर तरुणाला अस्वस्थ वाटू लागले. हा धूर लिक्वेड नायट्रोजनचा होता त्यामुळे त्याच्या पोटात दुखू लागले आणि श्‍वास घ्यायलाही त्रास व्हायला लागला. हा तरुण तातडीने रुग्णालयात दाखल झाला आणि डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले. काही वेळातच या तरुणाच्या पोटात खड्डा पडला असल्याचे डॉक्टरांना लक्षात आले आणि त्यांनाही हे पाहून धक्काच बसला.

Jadhao Clinic

या मुलाने घेतलेल्या पेयात द्रव पातील नायट्रोजन होते. जे १९५.८ डिग्री सेल्सियसला उकळलेले होते. हे उकळलेले नायट्रोजन अन्नपदार्थ आणि पेय गार करण्यासाठी किंवा गोठवून ठेवण्यासाठी वापरला जातो. रंगहिन द्रव पदार्थ कॉम्प्युटरला देखील थंड ठेवण्यासाठी वापरला जातो. अनेक पेयांना गार करण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग केला जातो. मात्र नायट्रोजन विशिष्ट पदाथार्तून पूर्णपणे उडून गेल्यानंतर मगच ते पेय पिण्यासाठी योग्य असते. पण त्याने कोणतीही काळजी न घेता याचे सेवन केल्यानं त्याला ते चांगलेच महागात पडले.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!