शनिवारी मध्यरात्री नाहिसा होणार अंधार, उजाडणार दिवस

जबरदस्त उल्कापात पाहण्यासाठी सर्वांना उत्सुकता

0

वॉशिंग्टन: ११-१२ ऑगस्टच्या मध्यरात्री खगोलविश्वात एक अविश्वसनीय घटना घडणार आहे. ११ तारखेला रात्री १२ वाजल्यानंतर म्हणजेच १२ तारखेचा दिवस उजाडण्याआधी जी रात्र असेल ती रात्र दिवसाप्रमाणे उजळून निघणार आहे.

खगोलशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या रात्री मोठा उल्कावर्षाव होणार आहे. खरेतर दरवर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान एकदा किंवा दोनदा उल्कावर्षाव होतो. मात्र यावेळी होणार्‍या वर्षावातल्या उल्का या आकाराने मोठय़ा आणि जास्त चकाकणार्‍या असतील. तसेच प्रत्येक तासाला अशा साधारण २00 उल्का पृथ्वीवर कोसळतील.ज्यामुळे आकाश उजळून निघेल. उत्तर गोलार्धातून हा उल्का वर्षाव सगळ्यात चांगल्या पद्धतीने पाहता येईल, असेही खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. नासानेही यासंदर्भातली माहिती प्रसारित केली असून यावेळचा उल्का वर्षाव हा मोठा आणि जास्त तेजस्वी असणार आहे, असे म्हटले आहे.

उल्का वर्षाव म्हणजे आकाशातून अनेक उल्का पृथ्वीवर पडतात. या उल्का म्हणजे तुटणारे तारेच असतात. या खाली पडत असताना त्यांचा जो अंश पृथ्वीवर पडतो त्याला उल्कापिंड असे म्हणतात. आकाशात आपण अशा अनेक उल्का पाहू शकतो. ११ ऑगस्टच्या रात्री जो उल्का वर्षाव होणार आहे त्यामुळे आकाश उजळून निघणार आहे म्हणूनच त्यादिवशीची रात्रही प्रकाशमय असेल, असे मत खगोल शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!