प्रेमासाठी वाट्टेल ते…! प्रियकरासाठी तिनं सोडली अब्जावधींची संपत्ती

वडील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, वडिलांचा लग्नाला विरोध

0 2,374

क्वालालंपूर: प्रेमात माणूस काय करेल हे सांगता येत नाही. असं म्हणतात की खरं प्रेम हे त्यागातून दिसून येतं. एखाद्या श्रीमंत कुटुंबात जन्माला येणं आणि प्रेम कोणावर होणं हे नक्कीच आपल्या हातात नसते. मलेशियामधील अँजेलिन फ्रान्सिस खू हिने आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी स्वत:च्या ऐश्‍वर्यसंपन्न आयुष्याचा त्याग केला. हिची श्रीमंती म्हणजे तिला स्वतःसाठी खासगी विमान आहे. जगातील सर्व खंडांमध्ये तिचं घर आहे, तिच्यासाठी २४ तास सुरक्षा यंत्रणा आहे. मात्र हे सर्व त्यागून तिनं तिच्या प्रियकराची निवड केली आहे.

मलेशियामधील अँजेलिन फ्रान्सिस खू २00१ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेली होती. त्यावेळी कामाचा अनुभव घेण्यासाठी ती लॉरा अँशलीच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जात होती. त्यावेळी २00८ मध्ये ऑक्सफर्डमधून पदव्युत्तर शिक्षण घेत असताना ती जेदिदाह फ्रान्सिस याच्या प्रेमात पडली. मूळचा कॅरिबियामधील असलेला जेदिदाह हा शास्त्रज्ञ म्हणून काम करत होता इतकेच नाही तर तो पेम्ब्रोक कॉलेजमध्ये ज्युनिअर डिन होता. आपल्या प्रेमाबद्दल तिने आपल्या वडिलांना कल्पना दिली, मात्र त्यांनी त्यास नकार दिला.

तायकून काय पेंग या तिच्या पित्याने लग्नाला नापसंती दर्शविल्याने तिने त्यांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. पेंग हे साधेसुधे कोणी नसून मलायन युनायटेड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आहेत. ही एक मोठी गुंतवणूक कंपनी असून अमेरिकेतील लॉरा अँशली या एका बड्या लाईफस्टाईल कंपनीचेही ते भागधारक आहेत. मलेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ओळख असून फोब्र्जच्या यादीनुसार त्यांची मालमत्ता ३0 कोटी डॉलर्स इतकी आहे.

(शनिवारी मध्यरात्री नाहिसा होणार अंधार, उजाडणार दिवस)

आपण मनाचा कौल घेतला तर आपल्याला आपल्या घरून कोणत्याही प्रकारचे अर्थिक सहाय्य तर मिळणार नाहीच पण कुटुंबाशी पूर्णपणे संबंध तोडावे लागतील याची तिला पूर्ण कल्पना होती. मात्र तिने प्रेमालाच आपली पसंती देत ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Comments
Loading...